शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांपासून नळयोजना बंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:44 IST

औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर व परिसरातील गावात व वाडी- तांड्यावरील विहिरींची पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यामुळे यावर्षी भिषण पाणीटंचाई निर्माण झाली असून मागील ३ वर्षांपासून २३ गाव प्रादेशिक नळयोजना बंद आहे. पाणीटंचाईमुळे ही योजना सुरू करण्याची मागणी ग्रामस्थ व सरपंचांनी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर व परिसरातील गावात व वाडी- तांड्यावरील विहिरींची पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यामुळे यावर्षी भिषण पाणीटंचाई निर्माण झाली असून मागील ३ वर्षांपासून २३ गाव प्रादेशिक नळयोजना बंद आहे. पाणीटंचाईमुळे ही योजना सुरू करण्याची मागणी ग्रामस्थ व सरपंचांनी केली आहे.यंदा अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने शिरडशहापूर, सारंगवाडी येथील नळयोजनेवरील विहिरींची पातळी दिवसेंदिवस खालावत जात असल्याने सध्या ६ ते ७ दिवसाआड नळांना पाणीपुरवठा गावकऱ्यांना होत आहे. गेल्या १० ते १५ दिवसांपासून वारे सुटत असल्यामुळे गावातील हातपंपाचे पाणी कमी झाले आहे. तसेच गावातील एखादा हातपंप सोडला तर सर्वच हातपंप पाण्याअभावी बंद अवस्थेत आहेत. नळयोजनेवरील विहिरींचे पाणीपातळी कमी झाल्याने बाजूलाच असलेल्या सारंगवाडी व आश्रमशाळेच्या विहिरीला मुबलक पाणी असल्याने २ ते ३ दिवसांपासून पाणी घेण्यात आले आहे. महाराष्टÑ जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषद हिंगोलीमार्फत राबविण्यात येणारी २३ गाव पाणीपुरवठा योजनेवर जवळपास २५ गावे अवलंबून आहेत; परंतु या योजनेचे पाणी गेल्या ३ वर्षांपासून बंद झाल्याने व या योजनेंतर्गत समाविष्ठ असलेल्या गावांना दुष्काळात पर्यायी व्यवस्थेसाठी शासनाकडून कोणताच निधी खर्च करण्यात येत नसल्याने ही सर्वच गावे तहानलेलीच असतात.यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीपासूनच परिसरातील टाकळखोपा, लक्ष्मणनाईक तांडा, काळापाणीतांडा, संघनाईक तांडा, सावरखेडा, काठोडा, मार्डी, वाई, गोरखनाथ, चोंढी स्टेशन, चोंढी शहापूर आदी गावे त्या योजनेवर अवलंबून आहेत. उर्वरित काही गावे जलस्वराज्य योजना या दुरूस्तीअभावी बंद आहे.दरवर्षी उन्हाळा सुरू होताच टाकळखोपा व तांड्यावर टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यावर्षी टाकळखोपा येथे टँकर सुरू आहे. सध्या सर्वच गावांत तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. गावातील विहिरींना पाणी नसल्यामुळे खासगी जलस्त्रोतांवर पाण्यासाठी झुंबड उडत आहे. वाई गोरखनाथ येथे सेंदूरसना तलावातून व राजवाडी येथून गावातील विहिरीत पाणी सोडण्यात येत होते; परंतु ती योजनाही नादुरूस्त असल्यामुळे गावातील लोकांना आज पाण्यासाठी शेतातील विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे. तीर्थक्षेत्र असलेल्या गावात येणाऱ्या भाविकांना प्यायलासुद्धा पाणी मिळत नाही. गावात कार्यक्रम असला तर नागरिक मोफत टँकरने पाणीपुरवठा करतात.२३ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद झाल्यापासून महाराष्टÑ जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषद टंचाई उपाययोजनेबद्दल फारसे गांभीर्य दाखविले जात नसल्यामुळेच गावात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

टॅग्स :Waterपाणीwater shortageपाणीटंचाई