शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आज हिंगोलीत महाआरोग्य शिबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 00:32 IST

येथे होणाऱ्या महाआरोग्य शिबिराची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. रेल्वेस्थानक परिसरातील भव्य मैदानावर विविध प्रकारच्या आजारांचे फलक लावून स्टॉल उभारले असून पार्किंगची वेगळी यंत्रणा करण्यात आली आहे. या शिबिराला वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन हजेरी लावणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथे होणाऱ्या महाआरोग्य शिबिराची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. रेल्वेस्थानक परिसरातील भव्य मैदानावर विविध प्रकारच्या आजारांचे फलक लावून स्टॉल उभारले असून पार्किंगची वेगळी यंत्रणा करण्यात आली आहे. या शिबिराला वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन हजेरी लावणार आहेत.या शिबिरासाठी मागील आठ दिवसांपासून तयारी सुरू होती. जिल्हाभरातील शासकीय आरोग्य संस्थांमधून रुग्णांची नोंदणी करण्यात आली होती. यात गंभीर आजाराच्या रुग्णांनाच या शिबिरासाठी पाठविण्यास सांगण्यात आले होते. यात १.७0 लाख रुग्णांची नोंदणी झाल्याची माहिती देण्यात आली होती. आज सकाळपासून या ठिकाणी शासकीय यंत्रणा, विविध सेवाभावी संस्था, स्वयंसेवक राबत होते. पार्किंगसाठीचा परिसर स्वच्छ केला असून रेल्वे पटरीच्या बाजूने सुरक्षिततेचे उपाय, स्वच्छतागृहे, कचराकुंड्या आदींची व्यवस्था करण्यात आली. या शिबिरासाठी जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरून आलेल्या कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यात योग्य पद्धतीने नियोजन होण्यासाठी कर्मचाºयांना सूचना देण्यात आल्या. अनेक नामांकित व आंतरराष्ट्रीय दर्जाचे डॉक्टर येणार असल्याने त्यांचा वेळ वाया जावू नये, असे नियोजन करण्यास सांगण्यात आले.यात १८00 तज्ज्ञ डॉक्टर १९ प्रकारच्या विविध आजारांचे रुग्ण तपासतील. १00 बाह्यरुग्ण कक्षांत तपासणीस इसीजी, बीएसडी, पीएफटी, मॅमोग्राफी आदी साहित्य राहिल. १५00 कर्मचारी व ७ हजार स्वयंसेवक राबतील. १.२५ कोटींची मोफत औषधी उपलब्ध होईल. १ लाख रुग्णांचे जेवण, १८ रुग्णवाहिका, ३ चौकशी कक्ष, ३ आपातकालीन कक्ष असा २५ हेक्टरवर विस्तार राहील.आज आ.तान्हाजी मुटकुळे, माजी खा.शिवाजी माने, माजी आ. गजानन घुगे, रामेश्वर नाईक, शिवाजी जाधव, डॉ.सचिन बगडिया आदींची या ठिकाणी उपस्थिती होती. तर शेकडो स्वयंसेवकही दिसत होते. या स्वयंसेवकाच्या नियोजनासाठीही वेगळी बैठक दुपारी झाली.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल