लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : २0१९ मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे २0१८ मध्ये कामे सुरू केल्यास त्याचा फायदा होईल, या आशेने की काय? यंदा आमदार व खासदारांनी निधी खर्च करण्यात हात आखडता घेतला आहे. २0१८ मध्ये एकदाच कामांचा भडिमार होण्याची शक्यता दिसत आहे. सर्वांचा १३ कोटींचा स्वेच्छा निधी असून कामे मात्र २४ सुरू आहेत. तर खर्च ५७ लाखांचा आहे.हिंगोलीचे खा.राजीव सातव यांच्या कार्यक्षेत्रात हिंगोली, नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील काही भाग येतो. त्यामुळे त्यांना या तीन जिल्ह्यांत निधी विभागून द्यावा लागतो. २0१४-१५ मध्ये त्यांनी ५ कोटींतून १६७ कामे प्रस्तावित केली होती. ७८ पूर्ण झाली. ४.९१ कोटी खर्च झाले. ४ कामे रखडलेली आहेत. २0१५-१६ मध्ये ५.0८ कोटींतून १६५ कामे प्रस्तावित केली होती. ८२ पूर्ण झाली. ९ रखडली. तर ४.0५ कोटी प्रत्यक्ष खर्च झाला. २0१६-१७ मध्ये २.५६ कोटींच्या निधीतून १५३ कामे प्रस्तावित केली होती. ५७ मंजूरपैकी ८ पूर्ण २८ रखडलेली आहेत. २0१७-१८ मध्ये ३.५६ कोटींच्या निधीत ८१ कामे प्रस्तावित, २५ मंजूर व ९ सुरू झाली आहेत. यासाठी २५ लाख वितरित केले आहेत. त्यांना आतापर्यंत १६.२१ कोटी मिळाले असून यापूर्वीची ७४ कामे पूर्ण करायची आहेत. यंदा केवळ ९ कामेच असल्याने आता मार्चनंतर जोरात मोहीम राबविली जाईल, असे दिसते.आमदारांना प्रत्येकी २ कोटी रुपयांचा स्वेच्छा निधी दिला जातो. यामध्ये हिंगोलीचे आ.तान्हाजी मुटकुळे यांच्या मतदारसंघातील २0१६-१७ मधील ४७ कामे अपूर्ण आहेत. त्यासाठी १.0५ कोटी लागणार आहेत. तर २0१७-१८ मध्ये त्यांनी १ काम प्रस्तावित केले आहे. दीडपट नियोजनास १.४१ कोटी उपलब्ध होवू शकतात. वसमतचे आ.जयप्रकाश मुंदडा यांच्या मतदारसंघात २0१६-१७ मधील ३१ कामे अपूर्ण असून त्यासाठी ३७.१९ लाख लागणार आहेत. २0१७-१८ मध्ये ४ कामे प्रस्तावित केली असून दीडपट नियोजनात त्यांना २.४४ कोटी उपलब्ध होवू शकतात. कळमनुरीचे आ.संतोष टारफे यांच्या मतदारसंघात २0१६-१७ मधील ४३ कामे अपूर्ण आहेत. त्यासाठी ३६.६0 लाख लागणार आहेत. तर नवीन एकही काम प्रस्तावित नसल्याने २.४५ कोटी दीडपट नियोजनात उपलब्ध होवू शकतात. या तिघांचाही अपूर्ण कामांवरील खर्च १७.२४ लाख तर नवीन कामांवरील २.९६ लाख एवढा आहे.हिंगोली जिल्ह्यात आ.रामराव वडकुते हे विधान परिषद सदस्य आहेत. त्यांनीही २0१६-१७ मध्ये प्रस्तावित केलेल्या कामांपैकी १७ कामे अपूर्ण आहेत. यासाठी ६२.३५ लाख लागणार आहेत. शिवाय २0१७-१८ मध्ये ९ कामे प्रस्तावित केली आहेत. दीडपट नियोजनात त्यांच्याकडे २.0६ कोटी उपलब्ध आहेत. तर चालू वर्षांतील १२ लाख व जुनी ३६ लाखांची कामे सुरू आहेत.
यंदा आमदार-खासदारांनी हात आखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 00:04 IST
२0१९ मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे २0१८ मध्ये कामे सुरू केल्यास त्याचा फायदा होईल, या आशेने की काय? यंदा आमदार व खासदारांनी निधी खर्च करण्यात हात आखडता घेतला आहे. २0१८ मध्ये एकदाच कामांचा भडिमार होण्याची शक्यता दिसत आहे. सर्वांचा १३ कोटींचा स्वेच्छा निधी असून कामे मात्र २४ सुरू आहेत. तर खर्च ५७ लाखांचा आहे.
यंदा आमदार-खासदारांनी हात आखडला
ठळक मुद्देनिधी खर्चाचे प्रमाण किरकोळ : चार आमदारांची एकूण १४ तर खासदार निधीतून ९ कामेच सुरू