शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

औंढ्यात कयाधूचा तीन गावांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:26 IST

तालुक्यात पाच दिवसांत दोनदा अतिवृष्टी झाल्याने लघु व मध्यम तलाव जवळपास भरले आहेत. पूर, कंजारा, मेथा ,फुलदाभा, दरेंगाव, केळी, गोजेगाव गावाजवळून वाहणाऱ्या ओढ्यामुळे काही तास संपर्क तुटला होता. तर पूर, कंजारा परिसरात वाहणाºया कयाधू नदीचे पाणी ओसंडून वाहत असल्याने शेकडो हेक्टर जमिनी खरडून गेल्या आहेत. पाणी शेतामध्ये साचल्याने ाअनेक पिके धोक्यात आली असून ती पिवळी पडत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : तालुक्यात पाच दिवसांत दोनदा अतिवृष्टी झाल्याने लघु व मध्यम तलाव जवळपास भरले आहेत. पूर, कंजारा, मेथा ,फुलदाभा, दरेंगाव, केळी, गोजेगाव गावाजवळून वाहणाऱ्या ओढ्यामुळे काही तास संपर्क तुटला होता. तर पूर, कंजारा परिसरात वाहणाºया कयाधू नदीचे पाणी ओसंडून वाहत असल्याने शेकडो हेक्टर जमिनी खरडून गेल्या आहेत. पाणी शेतामध्ये साचल्याने ाअनेक पिके धोक्यात आली असून ती पिवळी पडत आहेत.औंढा तालुक्यातील औंढा नागनाथ, नागेश्वडी, वाळकी, पिपलदरी, सुरेगाव, येळी, केळी व काही छोटे तलाव सततच्या पावसामुळे भरण्याच्या उंबरठ्यावर आहेत. पावसामुळे सर्वच ओढे व नद्यांना पाणी आले आहे. यामुळे गोळेगावमार्गे कोंडशी, दरेगाव, नांदापूर, टाकळगव्हाण आदी गावांचे मार्ग काही काळ बंद झाले होते. या पाण्यामुळे शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. हळद, सोयाबीन, कापूस तूर आदी पिके पाण्याखाली आले आहेत.केळी जलाशय ९0 टक्क्यांवरकेळी जलाशय ९० टक्के भरला. तो परिसरात सर्वांत मोठा असून तीन वर्षांनंतर हे चित्र दिसत आहे. त्यामुळे या भागातील सिंचनाचा प्रश्न मिटला आहे. पार्डी, सावळी, येळी, केळी, हिवरखेडा साळणा ई गावाना याचा फायदा होणार आहे..४हिवरखेडा येथील शेतकरी पंढरी गिते यांचा दीड एकर कापूस उन्मळला. तर देवीदास गिते, संतोष गिते, विलास गिते, भास्कर गिते आदींच्या कापसाची हीच अवस्था आहे.केळी ते येळी फाटा मध्यभागी असलेल्या ओढ्याला मोठा पूर आल्याने केळी गावकºयांचा संपर्क तुटला. या भागातील नागरिकांना हा प्रश्न नेहमीच भेडसावतो.४काठोडा, अंजनवाडा, अनखळी या चार गावात पावसामुळे सुमारे १५ जणांची घरे पडली आहेत. तलाठ्यांनी तसा पंचनामा केले असून अहवाल जिल्हाधिकाºयांना कळविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी दिली आहे

टॅग्स :Rainपाऊसriverनदी