शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

श्रावण सोमवारी औंढा फुलले, बम बम भोलेच्या गजरात हजारो भाविकांनी घेतले नागनाथाचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 18:54 IST

दर्शनास जाण्यासाठी व बाहेर येण्यासाठी एकच मार्ग असल्याने एका भाविकाला किमान पाच ते सहा तासाचा वेळ लागत आहे.

औंढा नागनाथ (हिंगोली) : देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी प्रसिद्ध आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या नागनाथ मंदिरात श्रावणाच्या पहिल्या श्रावण सोमवारी पहाटे दोन वाजेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. भाविकांनी मोठ्या मनोभावे हर हर महादेवाच्या गजरात प्रभू नागनाथाचे दर्शन घेतले. श्रावणी सोमवार व नागपंचमी सलग दोन दिवस लागोपाठ आल्याने भाविकांचा ओढा कायम राहील अशी शक्यता आहे.

संस्थानचे अध्यक्ष तहसीलदार डॉक्टर कृष्णा कानगुले यांच्या हस्ते प्रभू नागनाथाची शासकीय महापूजा करण्यात आली. यानंतर पहाटे दोन वाजता भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. गत दोन वर्षापासून कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद होते. यावर्षी कोरोना लाट ओसरल्याने नियम आणि अटीविना दर्शनाची मुभा आहे. यामुळे भाविकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. राज्यासह गुजरात, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, दिल्ली, मुंबई येथून भाविकांनी हर हर महादेवाच्या गजरात दर्शन घेतले. मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता. दरम्यान, संस्थानकडून गर्भ घरातील अभिषेक बंद करण्यात आले आहेत. रांगेतील भाविकांना पिण्याचे पाणी व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, भाविकांना दर्शनास जाण्यासाठी व बाहेर येण्यासाठी एकच मार्ग असल्याने एका भाविकाला किमान पाच ते सहा तासाचा वेळ लागत होता. जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक विवेकानंद वाखारे, कांबळे,पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे,एपीआय अनिल लांडगे, उपनिरीक्षक मुंजाजी वाघमारे पाटील आणि कर्मचाऱ्यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवत गर्दीचे नियंत्रण केले.

सुलभ दर्शनासाठी वेगळी व्यवस्था करावी सकाळी नऊ वाजल्यापासून दर्शन रांगेत लागले पाच घंटे झाले अद्यापही दर्शनाची प्रतीक्षा आहे - द्वारकाबाई नागरे, कौडगाव दर्शनाची रांग हळूहळू पुढे सरकत असल्याने सहा घंटे झाले अद्यापही दर्शन झाले नाही. आता पाय गळून आले आहेत. परंतु लवकरच दर्शन होईल अशी आशा आहे. सुलभ दर्शनासाठी वेगळी व्यवस्था करावी - जगन्नाथ हेबाडे, वलाना, परभणी

टॅग्स :HingoliहिंगोलीShravan Specialश्रावण स्पेशल