शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

रेकी करून म्हशी लांबविल्या! ४० ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांना पकडले; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2024 19:35 IST

दिवसा दुचाकीवरून जनावरांची रेकी करून रात्रीला वाहनात टाकून लंपास करणाऱ्या टोळीस जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

हिंगोली: दिवसा दुचाकीवरून जनावरांची रेकी करून रात्रीला वाहनात टाकून लंपास करणाऱ्या टोळीस जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. यासाठी पथकाने १०० किलोमीटरपर्यंत ४० ते ५० ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरटे निष्पन्न केले. यातील फरार तीन चोरट्यांचा शोध सुरू आहे. जिल्ह्यात पशुधनाची चोरी होण्याचे प्रमाण वाढले होते. शेतात, आखाड्यावर बांधलेली जनावरे टार्गेट करून वाहनातून रात्रीतून विल्हेवाट लावली जात होती. त्यामुळे पशुपालकांमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. 

दरम्यान, कळमनुरी शिवारातील नंदकुमार सोनटक्के यांच्या शेतातून दोन म्हशी चोरीला गेल्या होत्या. यातील चोरट्यांचा सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या पथकाने शोध घेण्यास सुरूवात केली. यातील चोरटे कळमनुरी येथे असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने अल्ताफ खान गफार खान पठाण, वसीम अक्रम शेख हबीब (दोघे रा. इंदिरानगर कळमनुरी), अजीम खान जरीब खान पठाण (रा. खाजा कॉलनी कळमनुरी) यांना ताब्यात घेतले. त्यांना विचारपूस केली असता त्यांनी म्हशीची चोरी केल्याची कबुली दिली. तसेच उरूज खान युसूफ खान (रा. खाजा कॉलनी कळमनुरी) याचेसोबत त्याचे दुचाकीवर रेकी केली. तसेच एका वाहनातून म्हशींची चोरी करून इमरान कुरेशी मकदूम कुरेशी व मकदूम कुरेशी मो. इस्माईल कुरेशी (दोघे रा. पूर्णा जि. परभणी) यांना विकल्याचे त्यांनी सांगितले. 

म्हशी विकून आलेले पैसे व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण ५ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. यातील रेकी करणारा व पूर्णा येथील म्हशी घेणारे असे एकूण तिघेजण फरार आहेत. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलिस अंमलदार राजू ठाकूर, नितीन गोरे, आकाश टापरे, आजम प्यारेवाले, नरेंद्र साळवे, प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने केली. 

सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरटे केले निष्पन्नदरम्यान, म्हशी चोरटे निष्पन्न करण्यापूर्वी पोलिसांनी १०० किलोमीटर अंतरावरील जवळपास ४० ते ५० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यात म्हशी चोरटे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी तिघांनाही उचलले. 

रॅकेटमध्ये प्रतिष्ठितांचा सहभागम्हशींची चोरी करून पूर्णा येथील दोघांना विक्री केल्या. पूर्णा येथील म्हशी घेणारे पितापुत्र असून एकजण एका पक्षाचा माजी नगरसेवक आहे. दोघे जण म्हशी चोरीचे रॅकेट चालवित असल्याचेही निष्पन्न होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. यात आणखी काही चोऱ्या उघडकीस येऊ शकतात, अशी शक्यताही पोलिसांनी वर्तविली आहे.   

दुचाकीवरून केली रेकीम्हशी चोरट्यासाठी चोरट्यांनी कोणाला संशय येऊ नये यासाठी दुचाकीवरून रेकी केली. त्यानंतर एका वाहनातून म्हशी टाकून विक्री केली.

टॅग्स :Hingoliहिंगोली