शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

वस्तीत पाणी सोडल्याचा वाद गेला ठाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 23:39 IST

कळमनुरी तालुक्यातील वडगाव येथील मागास वस्तीत रस्ता फोडून शेतातले पाणी सोडण्यात आले. या प्रकरणी बौद्ध समाजातील नागरिकांनी तहसीलदारांकडे दाद मागितली. तर बाळापूर पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही बाजूच्या व्यक्तींची सभा भरली आणि दोन्हीकडील समाजबांधवांना वाद वाढवू नये, अशा सूचना दिल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील वडगाव येथील मागास वस्तीत रस्ता फोडून शेतातले पाणी सोडण्यात आले. या प्रकरणी बौद्ध समाजातील नागरिकांनी तहसीलदारांकडे दाद मागितली. तर बाळापूर पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही बाजूच्या व्यक्तींची सभा भरली आणि दोन्हीकडील समाजबांधवांना वाद वाढवू नये, अशा सूचना दिल्या.कळमनुरी तालुक्यातील मौजे वडगाव येथील नानाराव बळवंतराव देशमुख, बाजीराव मुकिंदराव देशमुख, मुंजाजी बाबूराव देशमुख, संतोष मधुकर देशमुख यांनी त्यांच्या शेतातील पाणी बाहेर काढण्यासाठी रस्ता फोडून ते पाणी बौद्ध वस्तीत सोडले, असा आरोप बौद्ध समाजातील नागरिकांनी केला. याप्रकरणी कळमनुरीच्या तहसीलदार प्रतिभा गोरे यांना दिनांक ९ जुलै रोजी अर्ज देऊन बौद्ध वस्तीत सोडलेले पाणी अडविण्याची विनंती केली होती. परंतु त्यानंतरही हे पाणी सुरू असल्याने येथील बौद्ध वस्तीतील नागरिकांना याचा त्रास होत होता. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह व पुतळा परिसरातही पाणी साचत आहे. यामुळे डासांचा प्रादुर्भावही होत आहे. त्यामुळे याप्रकरणी न्याय द्यावा, अशी विनंती तहसीलदार यांच्याकडे अर्ज केला. त्यानंतरही संबंधित लोक ऐकत नसल्यामुळे बाळापूर पोलिस ठाण्यांमध्ये यासंबंधाने अर्ज दिला होता.बाळापूर पोलीस ठाण्यातील या भागाचे बीट जमादार वडकिले, शेख बाबर यांनी दोन्ही बाजूंच्या मंडळींना पोलीस ठाण्यात बोलावले. पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दोन्ही बाजूच्या मंडळीची मत-मतांतरे ऐकून घेतली. या कारणामुळे कोणताही वाद उद्भवू नये, अशी सूचना पोलिसांच्या वतीने देण्यात आली.पोलिसांना दिलेल्या निवेदनावर वडगाव येथील माणिक लोकडे, विजय महादेव लोकडे, भीमराव लोकडे, मधुकर संभाजी लोकडे, तुकाराम लोकडे, नामदेव लोकडे, श्यामराव लोकडे, रुस्तुम लोकडे, भीमराव लोकडे, रवींद्र लोकडे, भगवान लोकडे, दत्ता लोकडे, तुकाराम लोकडे यांच्यासह समाजबांधवाच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा