शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

अजूनही ५४ कोटी वर्ग करणे बाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 01:00 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ग्रीनलिस्टनुसार आतापर्यंत ३३८.९७ एवढी रक्कम जमा केली आहे. विविध निकषात पात्र असलेल्या ६८ हजार ४०४ लाभार्थ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला.

ठळक मुद्देकर्जमाफी : तीन वर्षांपासून सुरू आहे नुसते गु-हाळ

हिंगोली : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ग्रीनलिस्टनुसार आतापर्यंत ३३८.९७ एवढी रक्कम जमा केली आहे. विविध निकषात पात्र असलेल्या ६८ हजार ४०४ लाभार्थ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला. तर ६ हजार १२५ शेतकऱ्यांच्या खात्यावर ५४ कोटी रुपयांची रक्कम वर्ग करणे बाकीच आहे.शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शासनाकडून नियोजन केले जात असले तरी अजूनही अनेक लाभार्थी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कर्जमाफीच्या अनुदानापासून वंचित आहेत. परंतु संथगतीने का होईना लाभार्थी शेतकºयांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम वर्ग केली जात आहे. आतापर्यंत शासनाने जिल्ह्यातील विविध निकषामधील ६८४०४ लाभार्थी शेतकºयांच्या बँक खात्यावर ३३८.९७ कोटीं एवढी रक्कम वर्ग केली आहे. कर्जमाफीचा अद्याप ज्यांना लाभ मिळाला नाही, असे लाभार्थी मात्र संताप व्यक्त करीत आहेत. परंतु अनेकदा त्रुटींची पूर्तता करूनही कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याने असे काही शेतकरी अजूनही शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेतच आहेत.दीड लाखांच्या आतमध्ये असलेल्या ४७५३५ लाभार्थ्यांपैकी आतापर्र्यंत ४५४२६ जणांच्या बँक खात्यावर २६३.१२ कोटी जमा करण्यात आले आहेत. तर एक रक्कमी परतफेड करणाºया ५८५२ लाभार्थ्यांपैकी ३१६१ जणांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची ४८.९२ कोटी रक्कम वर्ग करण्यात आली आहे. तसेच सतत दोन वर्ष ज्या शेतकरी सभासदांनी कर्जफेड केली आहे त्यांना प्रोत्साहन म्हणून अनुदान दिले जाते. जिल्ह्यातील प्रोत्साहन दिल्या जाणाºया कर्ज खातेदारांची संख्या २११४२ असून त्यापैकी आतापर्यंत १९८१७ जणांच्या खात्यावर आतापर्यंत प्रोत्साहन म्हणून २६.९२ कोटी रक्कम जमा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शासनाच्या विविध निकषातील शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे.विविध निकषामध्ये असलेल्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांची संख्या ६८ हजार ४०४ असून या सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर आतापर्यंत शासनाकडून ३३८.९७ कोटी रूपये जमा करण्यात आले आहेत.प्रोत्साहन अनुदानसुद्धा खात्यावर वर्ग नाहीशासनाकडून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना कर्जमाफीची रक्कम संबधित बँकेत जमा केली. त्या अनुषंगाने सदर योजनेअंतर्गत बँकेत ३१ मे २०१९ अखेर जमा झालेल्या रक्कम संबधितांना वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.ग्रीन लिस्टनुसार कर्जमाफीसाठी पात्र असणाºया लाभार्थ्यांची संख्या ४७ हजार ५३५ एवढी होती. त्यांना २६७ कोटी रुपयांची माफी देणे अपेक्षित होते. यात राष्ट्रीयीकृत बँकांचे सर्वाधिक ३६ हजार ८९२, मध्यवर्तीचे ४८६१ तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे ५७८२ लाभार्थी होते. एकरकमी परतफेडीसाठी पात्र लाभार्थी ५८५२ होते. मात्र लाभ ३१६१ जणांनीच घेतला.या सर्व बाबींमध्ये प्रोत्साहन अनुदानाचे लाभार्थी ग्रीनलिस्टनुसार २१ हजार १४२ होते. मात्र त्यापैकी १९ हजार ८१७ लाभार्थ्यांनाच ते अदा केले. सतत दोन वर्षे कर्जफेड करणाºयांसाठीचे हे अनुदान का दिले नाही, हा प्रश्न आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरीMONEYपैसा