शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

...तर हिंगोली जिल्ह्याचे वाळवंट होईल; कयाधूचे पाणी इसापूर धरणात वळविण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 13:04 IST

गोदावरी खोरे महामंडळाकडून आणला जात आहे प्रस्ताव

ठळक मुद्देनदीच वळविली तर खरबीपासून खालच्या भागातील १00 ते १५0 गावांवर परिणाम १४ किमीचा बोगदा खोदून प्रवाही पद्धतीने पाणी इसापूर धरणात वळविण्याचा प्रस्ताव

हिंगोली : तालुक्यातील खरबी येथून बोगद्याद्वारे कयाधू नदीचेपाणी पैनंगगा नदीत सोडण्याचा प्रस्ताव गोदावरी खोरे विकास महामंडळाकडून आणला जात आहे. त्यास हिंगोली जिल्ह्याचा विरोध असून हा प्रकार म्हणजे हिंगोली जिल्ह्याचे वाळवंट करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप माजी खा. अ‍ॅड. शिवाजी माने यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे औरंगाबाद येथे बैठकीला येत आहेत. त्या पार्श्वभूमिवर हा प्रस्ताव मंजुरीसाठी आणला जात आहे. याद्वारे १0९ दलघमी पाणी कयाधूतून इसापूर धरणात सोडले जाणार आहे. इसापूर धरणाचा हिंगोली जिल्ह्याला काहीच फायदा होणार नाही. १४ किमीचा बोगदा खोदून प्रवाही पद्धतीने पाणी इसापूर धरणात वळविण्याचा आता महामंडळाचा प्रस्ताव आहे. त्याची किंमत ५१३ कोटी रुपये आहे. पूर्वी इसापूर व सापळी धरणाला १९६८ मध्ये एकत्रित मंजुरी दिली होती. तेव्हा ३५ कोटीत होणारा हा प्रकल्प २00५ मध्ये ३५५0 कोटींचा झाला होता. आता तो कोणत्याही परिस्थितीत रास्त नाही. मात्र कयाधू नदीच वळविली तर खरबीपासून खालच्या भागातील १00 ते १५0 गावांवर त्याचा परिणाम होईल. हे पात्र कोरडे होईल. या भागातील नियोजित बंधाऱ्यांना पाणी मिळणार नाही. आधीच पाच उच्च पातळी बंधारे प्रस्तावित असून हिंगोली जिल्ह्याचा वेगळा अनुशेष मंजूर झाला तरीही त्यांचा प्रश्न सुटला नाही.

यापूर्वी मेंढेगिरी लवादानेही जिल्ह्यासाठी १0८ दलघमी पाणी आरक्षित केले असून त्याचेही कोणतेच नियोजन महामंडळाने केलेले नाही. मात्र हा नवा प्रस्ताव आणून महामंडळ हिंगोली जिल्ह्याच्या विरोधात भूमिका घेत असल्याचेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.  

टॅग्स :riverनदीHingoliहिंगोलीWaterपाणी