शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाने हॉटेलमध्ये घुसून वडिलांच्या मित्राचा कापला गळा; छातीवर केले सपासप वार

By विजय पाटील | Updated: September 1, 2022 13:39 IST

आरोपीस पोलीस वाहनातून हलवित असताना मृताचे नातेवाईक वाहनावर चालून गेले.

आखाडा बाळापूर ( जि.हिंगोली) : कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथील गौतम कोंडबा नरवाडे या ५५ वर्षीय इसमाचा खंजरने गळा कापून खून केल्याची घटना गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास घडली. यानंतर गावात जाऊन आखाडा बाळापूर पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले असले तरीही मयताच्या नातेवाईकांनी आरोपीस आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करीत बाळापूर येथे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको सुरू केल्याने गोंधळ उडाला आहे.

शेवाळा येथील गौतम नरवाडे हे चौकातील एका हॉटेलमध्ये सकाळी दहा वाजता चहा पित बसले होते. शेख मुस्तफा शेग जिलानी हा युवक तेथे आला. त्याने काही कळायच्या आता नरवाडे यांचा खंजरने गळा कापून छातीत दोन ते तीन वार केले. यानंतर तो तेथेच थांबला. लोकांनी गर्दी केली. हळूहळू मयताचे नातेवाईकही जमले. त्यानंतर काहींनी आरोपीस मारहाण केली. 

तोपर्यंत पोलीसही दाखल झाले होते. त्यांनी आरोपीस वैद्यकीय चाचणीसाठी बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. अवघ्या एक किमी अंतरावर असलेल्या शेवाळा येथील नागरिकही मागोमाग तेथे धडकले. आरोपीस वाहनातून हलवित असताना ते वाहनावर चालून गेले. मात्र पोलिसांनी शिताफीने आरोपीस कळमनुरीला हलविले. आरोपीस आमच्या ताब्यात द्या म्हणून ग्रामस्थांनी आखाडा बाळापूर येथे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केला. बायपासही अडविला आहे. दुपारी १ वाजेपर्यंत हा गोंधळ सुरू होता. उपविभागीय अधिकारी किशोर कांबळे बाळापुरात दाखल झाले असून नातेवाईकांच्या भावना जाणून घेत आहेत.

मयत हे पाणीपुरवठा योजनांच्या गळती दुरुस्तीची कामे करतात. तर आरोपीच्या वडिलाचे मित्र आहेत. शिवाय मयत नरवाडे यांच्या पत्नी ग्रामपंचायत सदस्याय आहेत. शेखने हे टोकाचे पाऊल का उचलले? हे मात्र अजून कळाले नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली