शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महालिंगी येथील ग्रामपंचायतीवर ग्रामस्थांचा घागर मोर्चा, चार महिन्यांपासून मिळत नाही ग्रामस्थांना पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 21:11 IST

Hingoli News: दाभडी ग्रामपंचायतअंतर्गत महालिंगी येथे मागील चार महिन्यांपासून पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी तब्बल चार किलोमीटरपर्यंत भटकंती करावी लागत आहे. वेळोवेळी सांगूनही लक्ष न दिल्याने अखेर ग्रामस्थांनी २५ मार्च रोजी ग्रामपंचायतवर घागर मोर्चा काढला. 

- विश्वास साळुंके वारंगा फाटा (जि. हिंगोली) - दाभडी ग्रामपंचायतअंतर्गत महालिंगी येथे मागील चार महिन्यांपासून पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी तब्बल चार किलोमीटरपर्यंत भटकंती करावी लागत आहे. वेळोवेळी सांगूनही लक्ष न दिल्याने अखेर ग्रामस्थांनी २५ मार्च रोजी ग्रामपंचायतवर घागर मोर्चा काढला. 

कळमनुरी तालुक्यातील दाभडी ग्रामपंचायतअंतर्गत महालिंगी येथे मागील चार महिन्यांपासून पिण्याचे पाणी मिळत नाही. परिणामी ग्रामस्थांना जवळपास पाच किलोमीटर अंतरापर्यंत पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वेळोवेळी संबंधित विभाग, अधिकारी व कर्मचाऱ्यांना सांगूनही कोणी लक्ष दिले नाही. त्यामुळे शेवटी ग्रामस्थांनी  २५ मार्च रोजी ग्रामपंचायतवर घागरमोर्चा काढला.

गावातील सर्व महिला,पुरुष हे पाण्याची भांडी घेऊन ग्रामपंचायतसमोर सकाळी ते दोन  वाजेपर्यंत उन्हात ठाण मांडून बसले होते. यापूर्वी जिल्हा प्रशासनाला  ग्रामस्थांनी घागर मोर्चा व उपोषणा संदर्भात २४ मार्च रोजी निवेदन दिले होते. ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून प्रचंड पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्या बाबत म्हटले होते.  तसेच सदरील बाब अनेकवेळा गटविकास अधिकारी कळमनुरी यांच्या निदर्शनास आणून  देखील त्यांनी कुठल्याही प्रकारची उपाययोजना केली नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

पाण्याची तात्पुरती व्यवस्था केली... ग्रामपंचायतवर घागर मोर्चा काढल्यानंतर अखेर गटविकास अधिकाऱ्यांनी तात्काळ ग्रामस्थांसाठी तात्पुरती टँकरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. लवकरच ग्रामस्थांना पाणीपुरवठा सुरळीत चालू होईल, असे आश्वासन गटविकास अधिकाऱ्यांनी दिल्याचे  ग्रामस्थ गुणाजी चाकोते यांनी सांगितले. जर नळाद्वारे किंवा टँकरद्वारे पाणी सुरळीत नाही मिळाले तर ग्रामपंचायतीसमोरच  उपोषण करणार असल्याचेही  चाकोते यांनी सांगितले.

टॅग्स :Hingoliहिंगोली