शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

तंबाखू व्यापाऱ्याच्या डोळ्यात चटणी टाकून चोरट्यांनी साडेबारा लाखांची रोकड लुटली

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: March 20, 2024 13:11 IST

या घटनेमुळे हिंगोलीमधील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हिंगोली : दुकानातील उधारी जमा झालेली साडेबारा लाखांची रक्कम घेऊन घराकडे निघालेल्या एका व्यापाऱ्याच्या डोळ्यात चटणी टाकून खाली पाडले. त्यानंरत चाकूचा धाक दाखवून पैशाची बॅग घेऊन तिघांनी पळ काढला. ही घटना हिंगोली शहरात १९ मार्च रोजी रात्री १०:१५ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

हिंगोली शहरातील भाजीमंडई येथे आनंद हरिप्रसाद अग्रवाल (रा. एनटीसी हिंगोली) यांचे अग्रवाल जर्दा स्टोअर्स नावाचे दुकान आहे. दुकानात जर्दा, सिगारेट, सुपारी यांची होलसेल व किरकोळ विक्री करतात.  १९ मार्च रोजी त्यांनी व्यापाऱ्यांना दिलेल्या जर्दा, सिगारेट, सुपारी या मालाची वसुली केली होती. दिवसभर १२ लाख ५० हजारांची रक्कम जमा झाली होती. ही रक्कम बँकेत जमा करावयाची असल्याने मंगळवारी रात्री १० वाजता दुकान बंद करून  ते पैशांची बॅग घेऊन घरी निघाले होते. त्यांच्यासोबत दुकानातील नोकर सुनील सरकटे होता. ते दुचाकीने अग्रसेन चौक मार्गे सचिन टेलर यांच्या दुकानासमोरून आशा सायकल स्टोअर्स दुकानाकडे जात असताना पाठिमागून एका दुचाकीवरून तिघेजण आले. त्यांनी आवाज दिल्याने अग्रवाल व त्यांच्या नोकराने मागे वळून पाहिले. याच वेळी तिघांनी अग्रवाल व नोकराच्या डोळ्यात चटणी टाकत दुचाकीवर लाथ मारली. त्यामुळे अग्रवाल व नोकर दोघेही दुचाकीवरून खाली पडले. त्यानंतर एकाने चाकूचा धाक दाखवित १२ लाख ५० हजार रूपयांची रोकड असलेली पैशाची बॅग ओढून घेत दुचाकीवर बसून तिघांनी पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तो पर्यंत लुटारू पळून गेले होते. 

तोंडाला बांधला होता काळा रूमाल डोळ्यात चटणी टाकून पैशाची बॅग घेऊन पळालेल्या तिघांपैकी एकाने तोंडाला काळा रूमाल बांधला होता. अग्रवाल यांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत ते पसार झाले होते. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या प्रकरणी आनंद अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली