शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

हळदीच्या वाहनांची रांग लांबतेय; शेतकऱ्यांचा मार्केट यार्डातला मुक्काम वाढला

By रमेश वाबळे | Updated: April 5, 2024 19:06 IST

जवळपास पाच हजार क्विंटल हळद विक्रीसाठी मार्केट यार्डमध्ये; वाहनांच्या रांगा कायम

हिंगोली : येथील बाजार समितीच्या मार्केट यार्डात मागील दोन दिवसांपासून हळदीची आवक वाढली आहे. ५ एप्रिल रोजी जवळपास पाच हजार क्विंटल हळद विक्रीसाठी आल्याने मार्केट यार्ड आवाराच्या बाहेर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

हिंगोली येथील संत नामदेव मार्केट यार्ड हळद खरेदी - विक्रीसाठी मराठवाड्यासह विदर्भात प्रसिद्ध आहे. या मार्केट यार्डात मागील पंधरवड्यापासून सरासरी दीड ते दोन हजार क्विंटल हळदीची आवक होत होती. मध्यंतरी मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर मार्केट यार्ड बारा दिवस बंद होते. ३ एप्रिल रोजी मार्केट यार्ड सुरू होताच आवक वाढली. शुक्रवारी पाच हजार क्विंटलवर हळद विक्रीसाठी आली होती. त्यामुळे मार्केट यार्ड आवारात वाहने उभी करण्यासाठी जागा अपुरी पडल्याने रेल्वेस्टेशन रोडवर रांग लागली होती.

शेतकऱ्यांचा दोन दिवसांचा मुक्काम....मार्केट यार्डात हळदीची आवक वाढल्यामुळे एका दिवसात मोजमाप होणे शक्य होत नसल्याने शेतकऱ्यांना एक ते दोन दिवसांचा मुक्काम टाकावा लागत आहे. येणाऱ्या दिवसात आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजार समितीने काट्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

१३ ते १६ हजार रुपये भाव....यंदा उत्पादनात घट झाली असली तरी हळदीला समाधानकारक भाव मिळत आहे. सध्या हिंगोलीच्या मार्केट यार्डात १३ ते १६ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. येणाऱ्या दिवसांतही भाव कायम राहण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीHingoliहिंगोलीAgriculture Sectorशेती क्षेत्र