शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

Video: शेतात जाण्यास वडिलांना त्रास होऊ लागला, मुलाने भंगारातून बनवली इलेक्ट्रिक बाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 14:28 IST

भंगारातून भरारी! शेतकऱ्याच्या मुलाने बनविली टाकाऊतून इलेक्ट्रिक बाईक; ही बाईक अडीज तासाच्या चार्जिंगमध्ये १०० किमी धावते 

- इस्माईल जाहगीरदारवसमत: एखादी वस्तू, वाहन खराब झाले की, आपण एक तर अडगळीला टाकतो नाही तर भंगारात टाकतो. परंतु पार्डी (खुर्द) येथील शेतकरी कुटुंबातील होतकरू युवकाने भंगारातील साहित्य गोळा करुन चक्क इलेक्ट्रिक दुचाकी बनविली आहे. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वसमत तालुक्यातील पार्डी (खु.) येथील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील २० वर्षीय तरुण लोभाजी नरवाडे याने अवघ्या ३५ हजार रुपयांमध्ये भंगारातील साहित्यातून इलेक्ट्रिक दुचाकी बनविली. ही दुचाकी अडीच तास चार्जिंग केल्यानंतर १०० किलोमीटर धावू लागली आहे. दुचाकी बनविण्यासाठी लोभाजी नरवाडे याने तीन ते चार दिवस रात्रंदिवस अभ्यास केला. यापुढे चारचाकी प्रदूषणमुक्त कार बनविणार असल्याचा मानस लोभाजीने बोलून दाखविला.

वसमत तालुक्यातील पार्डी (खु.) येथील अल्पभूधारक शेतकरी लिंबाजी नरवाडे यांचा मुलगा लोभाजी नरवाडे (वय २०) याने वडिलांना शेताकडे जाताना होणारा त्रास पाहून जिद्दीने प्रदूषणमुक्त दुचाकी बनविण्याचा निर्णय घेतला. प्रथम लोभाजीने भंगारातील जुन्या दुचाकीचे ४ हजार रुपये किमतीत पार्ट खरेदी केले. दुचाकीसाठी लागणारी चार्जिंग ७२ व्हॅट, ४० एएम पाॅवरफुल बॅटरी तिची किंमत २२ हजार रुपये व २०० ते २५० किलो वजन ओढण्याची क्षमता असलेली पाॅवरफुल ‘बीएलडीसी’ मोटार व इतर साहित्य खरेदी केले. तसेच दुचाकीला लागणारे साहित्य खरेदीसाठी त्याला ३५ हजार रुपये खर्च आला. यानंतर दुचाकी बनविणे सुरू केले. यासाठी तीन दिवस लागले. भंगारातील साहित्यातून बनविलेली दुचाकी चढ-उतारावर धावत आहे,विनागेरची ही दुचाकी आहे. त्या दुचाकीवर सहज २०० ते २५० किलो वजन नेता येते. मी प्रदूषणमुक्त दुचाकी बनविली. भविष्यात प्रदूषणमुक्त कार बनविणार आहे, असे लोभाजी नरवाडे याने सांगितले.

कौशल्य विकास योजनेंतर्गत अभ्यासक्रम पूर्ण...लोभाजी नरवाडे याचे प्राथमिक शिक्षण दांडेगाव येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात झाले. वसमत येथे बारावी व बीए शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर नांदेड येथे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत अभ्यासक्रम पूर्ण केला. यापुढे आणखी टेक्निकल शिक्षण घेणार असल्याचे लोभाजी याने सांगितले.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरHingoliहिंगोली