शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस पक्षाने दाखविलेला विश्वास; प्रज्ञा सातव दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर

By प्रसाद आर्वीकर | Updated: July 15, 2024 13:17 IST

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या विजयानंतर विधान परिषदेसाठी मुस्लीम समाजातून उमेदवार द्यावा, अशी जोरदार चर्चा होती. त्यादृष्टीने तयारीही केली जात होती.

हिंगोली : विधानपरिषद निवडणुकीतील विजयानंतर आमदार प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर दाखविलेला विश्वास सातव यांनी सार्थ करून दाखविला आहे.विधानसभेतील आमदारांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या एका जागेसाठी काँग्रेस पक्षात मोठी स्पर्धा होती. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या विजयानंतर विधान परिषदेसाठी मुस्लीम समाजातून उमेदवार द्यावा, अशी जोरदार चर्चा होती. त्यादृष्टीने तयारीही केली जात होती. मात्र लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी दुसऱ्यांदा प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देऊन काँग्रेस पक्षासाठी काम करणारा नेता, पदाधिकारी, सामान्य कार्यकर्ता आणि कुटुंब काँग्रेससाठी किती महत्त्वपूर्ण आहे, हेच दाखवून दिले आहे. त्यामुळे काँग्रेससाठी देखील सातव यांचा विजय एका अर्थाने महत्त्वपूर्ण होता. 

राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी राहिलेले दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या आकस्मिक निधनानंतर गांधी परिवार त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला. २०२१ मध्ये काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली. या निवडणुकीत त्या बिनविरोध निवडून आल्या. या विजयाने प्रज्ञा यांची राजकारणात एन्ट्री झाली. मात्र काम करण्यासाठी साधारणत: दोन ते अडीच वर्षांचा अल्पसा कार्यकाळ त्यांना मिळाला. त्यामुळे काँग्रेसने यावेळेस पुन्हा एकदा आ. सातव यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत त्या विजयी झाल्याने दुसऱ्यांदा विधान परिषदेत प्रतिनिधित्व करणार आहेत.

मोठा राजकीय वारसासातव यांना कुटुंबातूनच राजकीय वारसा लाभला आहे. पती दिवंगत राजीव सातव यांनी कमी कालावधीत राजकारणात आपला वेगळा ठसा उमटविला. त्यांनी २००९ मध्ये आमदार, २०१४ मध्ये खासदार आणि २०२० मध्ये राजसभा सदस्य म्हणून कार्य केले आहे. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख होती. जिल्ह्यात अनेक विकासकामे त्यांच्या माध्यमातून मार्गी लागली आहेत. आमदार प्रज्ञा सातव यांच्या सासूबाई दिवंगत रजनी सातव यांनी पाच वेळा राज्यमंत्री म्हणून राजकारणात ठसा उमटविलेला आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीcongressकाँग्रेसVidhan Parishadविधान परिषद