शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतात थाटला महाजुगार अड्डा; पोलिसांच्या छाप्यात शिक्षकासह २५ जुगारी ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 12:14 IST

पोलिसांनी रोकडसह २० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे

वसमत (हिंगोली) : तालुक्यातील तुळजापुरवाडी शिवारात चालणाऱ्या महाजुगार अड्डयावर विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांच्या पथकाने मंगळवारी ( दि.६ ) सायंकाळी छापा मारला. यावेळी पोलिसांनी २५ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. यात एक शिक्षक असल्याची माहिती आहे. तर २० लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

वसमत तालुक्यातील तुळजापुरवाडी शिवारात शेतकरी दिलीप गणेश चव्हाण याच्या शेतात पत्राच्या शेडमध्ये अंदरबाहर नावाचा जुगार अड्डा सुरु होता. याबाबत माहिती मिळताच मंगळवारी सायंकाळी ७ वा विशेष पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या आदेशाने विशेष पोलीस पथकाने शेतात छापा टाकला. यावेळी पोलिसांनी २५ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. तसेच ६ लाख ८४  हजार रोकड, १० दुचाकी, २ कार असा एकूण २० लाख ३४ हजार ४३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात नांदेड जिल्हयातील कुंटुर पोलीस ठाण्याचे फौजदार दिनेश येवले यांच्या फिर्यादीवरुन आज पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी ताब्यात घेतलेले जुगारी: बिटासिंग नखुसिंग बावरी (रा झरी), लक्ष्मण राजानरसु गडप्पा रा रामकृष्ण नगर परभणी,गजानन गंगाधर दुधारे रा.फुकटगाव ता. पुर्णा जि.परभणी,गणेश अच्युतराव कदम रा.पुर्णा जि.परभणी,संजय मधोजी टेकोळे रा गौतम नगर परभणी, काशिनाथ सोपानराव चव्हाण रा. आडगाव,सागर तुकाराम मुंठे रा गौतम नगर परभणी,विशाल रामदास भिमरवार रा वसमत,दामोदर अमृतराव सावंत रा. बळेगाव ता. वसमत,गंगाधर गोमाजी मानवतकर ( ४८, व्यवसाय शिक्षक रा जवळा बाजार,विरसिंग मायासिंग दुधाणे रा झरी ता परभणी,संजय शेषराव थोरात रा विश्वा कार्नर परभणी, व्यंकटेश रमेश वानखेडे रा संत तुकाराम नगर परभणी,संजय दिगांबर घाडगे रा जिंतुर रोड परभणी,गजानन विठलराव चव्हाण रा आडगांव रंजे ता वसमत,विनय रमेश लहाणे व्यवसाय शिक्षण रा गौतमनगर परभणी,वैभव विश्वनाथ झोडपे रा महादेव नगर परभणी,माणिक लक्ष्मणराव कदम रा गणपती मंदिराजवळ पुर्णा,सिध्दांत बापुराव एंगडे रा.मातोश्री नगर परभणी,पंकज रामराव पांढरे रा गणेश पेठ वसमत,श्रीकांत भिमराव खाडे रा हटा,गंगाधर कदरप्पा पतीकोंडा रा माधव नगर परभणी,दिगांबर तुकाराम जाधव रा कुरझाळ ता औंढा,ललित वसंत कांबहे रा गौतम नगर परभणी

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली