शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धेश्वर धरणाचे दहा दरवाजे उघडले; पूर्णा नदीपात्रात विसर्ग वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 13:06 IST

सिद्धेश्वर धरणाची दहा गेट उघडून 50,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग पूर्णा नदी पात्रात करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे पूर्णा नदी पात्रा शेजारील परभणी व हिंगोली जिल्ह्यातील एकूण २७ गावांना सतर्कतेचा इशारा

औंढा नागनाथ (हिंगोली ):  तालुक्यातील सिद्धेश्वर धरणामध्ये येलदरी धरणातील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे धरणातील पाण्यासाठ्यात वाढ झाल्याने सोमवारी रात्री 10 वाजाता दहा गेट उघडण्यात आले आहेत. त्यामुळे पूर्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पाण्याच्या आवक वाढत गेली तर सळणा येथील पूल पाण्याखाली येऊन नांदेड-औरंगाबाद हा महामार्ग बंद होण्याची शक्यता आहे. 

औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरणाची दहा गेट उघडून 50,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग पूर्णा नदी पात्रात करण्यात येत आहे. या दरवाजे दहा फुटाने वर घेत पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे मातामाथा येथील पुलाच्या खालोखाल नदीपात्रातील पाणी वाहत आहे. पाण्याचा विसर्ग वाढत गेला तर येथून जाणारा महामार्ग बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलसंपदा विभाग व पोलिस प्रशासनाच्या वतीने या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. 

त्याचप्रमाणे पूर्णा नदी पात्रा शेजारील परभणी व हिंगोली जिल्ह्यातील एकूण २७ गावांना देखील महसूल प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूर्णा नदी पात्रातील पाणी पातळी वाढली असल्याने गावातील छोट्या ओढ्यांमधील पाणी या पात्रात येण्यास अटकाव होत आहे. यामुळे ओढ्यांचे पाणी आजुबाजुच्या शेतामध्ये जाऊन तुंबलेले आहे. या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाची हानी झाली आहे.

टॅग्स :Purna Riverपूर्णा नदीHingoliहिंगोलीRainपाऊस