लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर मोरवाडीजवळ वळणावर लग्नाचा टेम्पो उलटल्याने त्यातील १२ जण जखमी झाल्याची घटना ६ मे रोजी दुपारी १२.३० वाजता घडली.हिंगोली येथून लग्न आटोपून मोरवड येथील १५ ते २० जण टेम्पोने मोरवाडी येथे येत होते. टेम्पो मोरवाडी वळणावर येताच चालकाने अचानक ब्रेक मारल्याने जागेवरच कलंडला. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मिळेल त्या वाहनाने जखमींना ग्रामीण रूग्णालयात आणले. जखमींवर डॉ. आनंद मेणे, डॉ. दुर्गे यांनी उपचार केले. जखमीत नारायण मोरे (४२), बालाजी मोरे (२२), विष्णू शिरडे (२१), ज्ञानेश्वर खरवडे (२३), रविकुमार आमले (१९), अमोल खोकले (१८), अनिल आमले (२४), प्रेमकुमार आमले (२२), गंगाधर ठोंबरे (४९), नंदाबाई ठोंबरे (४१) (सर्व रा. मोरवड) यांचा समावेश आहे. नारायण मोरे हे गंभीर जखमी असल्याने त्यांना हिंगोली येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. सदर अपघाताबाबत कळमनुरी पोलिसांना विचारले असता त्यांनी सांगितले की, याबाबत ठाण्यात तक्रार आली नाही. त्यामुळे सदर घटनेची नोंद करण्यात आली नाही.
टेम्पो उलटून १२ व-हाडी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 23:36 IST