शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या नव्या बदली धोरणाविरोधात संघटना आक्रमक, तीन टप्यात करणार आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 16:47 IST

शिक्षक बदली धोरणाविरोधात सर्वच शिक्षक संघटना एकवटल्या असून बदली धोरणाचा विरोध करण्यासाठी शिक्षकांच्या वतीने तीन टप्यांत आंदोलन करण्यात येणार  आहे.

ठळक मुद्देशिक्षक बदलीच्या नवीन धोरणाला शिक्षकांकडून सुरूवातीपासूनच विरोध केला जात आहे.आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात ४ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

कळमनुरी ( हिंगोली): शिक्षक बदली धोरणाविरोधात सर्वच शिक्षक संघटना एकवटल्या असून बदली धोरणाचा विरोध करण्यासाठी शिक्षकांच्या वतीने तीन टप्यांत आंदोलन करण्यात येणार  आहे. त्या अनुषंगाने आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली असल्याची माहिती शिक्षक संघटना समन्वय समितीचे जिल्हा सचिव सुभाष जिरवणकर यांनी दिली.

शिक्षक बदलीच्या नवीन धोरणाला शिक्षकांकडून सुरूवातीपासूनच विरोध केला जात आहे. तरीही शासन बदलीचा रेटा लावत आहे. या संदर्भात आज शिक्षक समन्वय समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत बदल्याविरोधात आंदोलनाची दिशा ठरविण्यात असून नवीन बदली धोरणात दुरूस्ती करण्यात यावी, या मागणीसाठी आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात ४ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

यावेळी शिक्षकांच्या नवीन वरिष्ठ व निवड श्रेणीचा आदेश रद्द करावा, अंशदायी पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, अनावश्यक आॅन लाइन कामे बंद करावी आदी मागण्या संघटनेच्या वतीने केल्या जाणार आहेत. मोर्चात जिल्ह्यातील जवळपास ४ हजार शिक्षक सहभागी होणार आहेत. मोर्चानंतरही शिक्षकांच्या मागण्या मान्य न केल्यास दुस-या टप्प्यात आझाद मैदान येथे आंदोलन तर तिस-या टप्प्यात सामुहिक रजा आंदोलन केले जाणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. 

आंदोलनात १७ संघटनांचा सहभाग राहणार असून सदरचे आंदोलन हे महाराष्ट्र राज्य प्राथमिक संघटना समन्वय समितीच्या वतीने केले जाणार आहे. शिक्षकांच्या नवीन बदली धोरणाबाबत शासनासोबत अनेकदा चर्चा झाली. परंतु, यावर कोणताही तोडगा निघाला नसल्याने शिक्षक  संघटनांनी अखेर आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक