शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासामध्ये सातत्य ठेवल्याने ‘युपीएससी’ मध्ये स्वप्नीलचे स्वप्न पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 20:35 IST

जिद्द, चिकाटी, मोठ्यांचे आशिर्वाद आले फळा; पार्डीत आई-वडिलांचा सत्कार

इस्माईल जहागिरदार, वसमत: लहानपणापासून मी मोठा होऊन मोठी परीक्षा देणार, मोठा अधिकारी होणार, असे स्वप्नील बोलत असे. स्वप्नीलने अभ्यासात सातत्य ठेवल्यामुळे तो आज यशोशिखर गाठू शकला आहे. ‘यूपीएससी’ परीक्षेत त्याचे स्वप्न पूर्ण झाले, अशी प्रतिक्रिया सेवानिवृत्त पोलिस नायक चंद्रकांत बागल यांनी दिली.यूपीएससी २०२२ चा निकाल २३ मे रोजी जाहीर झाला. यात वसमत तालुक्यातील पार्डी (बागल) येथील स्वप्निल चंद्रकांत बागल याने बाजी मारत देशात ५०४ वा क्रमांकाने येण्याचा मान मिळवला.

स्वप्नीलने दिल्ली येथे ‘यूपीएससी’ परीक्षा दिली. स्वप्नील हा लहानपणापासून अभ्यासात सातत्य ठेवत आला आहे. पाचवी वर्गात असताना स्वप्नील नवोदयची परीक्षा उत्तीर्ण झाला. त्याचवेळी त्याने मी पुढे चालून मोठी परीक्षा देणार आहे. तसेच मोठा अधिकारी होऊन आई-वडिलांचे नाव रोषण करणार आहे, असे सांगितले.

२३ मे रोजी ‘यूपीएससी’ चा निकाल लागला. यावेळी तालुक्यातील पार्डी (बागल) येथे फटाक्यांची अतिषबाजी करत स्वप्नीलच्या आई-वडिलांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. चंद्रकांत बागल यांना दोन मुले आहेत. स्वत: चंद्रकांत बागल हे उच्चशिक्षीत आहेत. त्यांची पत्नी आशाताई बागल याही उच्च शिक्षीत आहेत.

पार्डी बागल येथे फटक्यांची अतिषबाजी...

दिवाळी सणाला ज्या प्रमाणे फटाक्यांची अतिषबाजी केली जाते. त्या प्रमाणे पार्डी (बागल) येथे २३ मे रोजी स्वप्नील याने ‘यूपीएससी’ परीक्षेत यश मिळविल्याने फटाक्यांची अतिषबाजी करण्यात आली. गावात सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जात होता. यावेळी गावकऱ्यांनी स्वप्नीलच्या आई-वडिलांचा पेढ्याचा घास भरवत फटाक्यांची अतिषबाजी करत सत्कार केला.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगHingoliहिंगोली