Suicide of young businessman in well at HIngoli | युवा व्यवसायिकाची कडती शिवारातील विहिरीत आत्महत्या
युवा व्यवसायिकाची कडती शिवारातील विहिरीत आत्महत्या

हिंगोली : तालुक्यातील कडती शिवारातील एका विहिरीत २२ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळल्याची घटना आज सकाळी (दि. ११) ६ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. नितेश रमेश वाघमारे असे मृताचे नाव असून व्यवसायातील अपयशाने त्याने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

कडती शिवारातील हरिशचंद्र रामप्रसाद शिंदे यांच्या विहिरीमध्ये मंगळवारी नितेश रमेश वाघमारे रा. कडती या युवकाचा मृतदेह आढळला. घरी न परतल्याने नातेवाईक त्याचा शोध घेत होते. त्यानंतर युवकास पाहण्यासाठी सर्वांनी विहिरीकडे धाव घेतली असता त्याचा मृतदेह विहिरीत आढळुन आला. सदर घटनेची माहिती पोलिसांना दिली असता घटनास्थळी पोलीस हजर झाले होते. केश कर्तनालयाचे दुकान चालत नसल्यामुळे या नैराश्यातून नितेशने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पंजाबराव भगवानराव राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नर्सी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.


Web Title: Suicide of young businessman in well at HIngoli
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.