शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या अनैतिक संबंधांमुळे आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 23:14 IST

येथे शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेवून एका ३४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना ३० आॅगस्ट रोजी दुपारी एक वाजता निदर्शनास आली. दुपारपासून हे प्रेत डॉक्टर व कटर नसल्याने शवविच्छेदन होत नसल्याने रात्री उशिरापर्यंत प्रेत तेथेच होते. नंतर पत्नीसह चौघांवर गुन्हा नोंद झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : येथे शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेवून एका ३४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना ३० आॅगस्ट रोजी दुपारी एक वाजता निदर्शनास आली. दुपारपासून हे प्रेत डॉक्टर व कटर नसल्याने शवविच्छेदन होत नसल्याने रात्री उशिरापर्यंत प्रेत तेथेच होते. नंतर पत्नीसह चौघांवर गुन्हा नोंद झाला.सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील हनुमान परसराम कावरखे (३४) यांनी सेनगाव रस्त्यालगत निळडव्ह शिवारात आपल्या शेतात लिबांच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना ३० आॅगस्ट रोजी सकाळी घडली. दुपारी १ वाजेच्या सुमारास काही शेतकरी व वाटसरूंच्या सदर घटना निदर्शनास आली. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. बीट जमादार भूमीराज कुमरेकर, पोकॉ भुजबळ यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. तद्नंतर शवविच्छेनासाठी प्रेत प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. मात्र येथेही डॉक्टर व कटर नसल्याने रात्री साडेआठ वाजेपर्यंत शवविच्छेदन झालेच नव्हते. दरम्यान, सायंकाळी सहानंतर पोलीस ठाण्यात मोठा जमाव जमला होता. रात्री साडेनऊच्या सुमारास यात पत्नी नितासह वाशिम जिल्ह्यातील किनखेडा येथील विठ्ठल दगडू अवचार व येवती येथील निर्मला रमेश शिंदे, रमेश शिंदे या चौघांवर गुन्हा दाखल झाला. यात निताचे विठ्ठलशी अनैतिक संबंध होते. याबाबत विचारणा केली असता मयतास विठ्ठलसह इतर दोघांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले.ऊसतोड कामगाराची आत्महत्याहिंगोली : तालुक्यातील अंभेरी येथे एका ऊसतोड कामगार असलेल्या युवकाने झाडाला दोरखंडाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मयत तरूणाचे नाव राहुल बाबूराव खंदारे (३४) आहे. मागील काही दिवसांपासून राहुल खंदारे चिंताग्रस्त असल्याचे ग्रामस्थांतून सांगितले जात होते. राहुल २९ आॅगस्ट रोजी घराबाहेर पडला, परंतु तो घरी परतलाच नाही. गावातील एका झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने राहुलचा मृतदेह गुरूवारी लटकेलेल्या अवस्थेत आढळला. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी