शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
3
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
4
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
5
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
6
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
7
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
8
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
9
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
10
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
11
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
12
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
13
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
14
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
15
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
16
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
17
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
18
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
19
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
20
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश

किन्होळा येथे २ एकरांमधील उसाला आग; अडीच लाख रूपयांचे झाले नुकसान

By यशवंत भीमराव परांडकर | Updated: January 26, 2024 21:19 IST

घटनेची माहिती मिळताच किन्होंळा सज्जाच्या तलाठी यू.बी. मैड यांनी सदरील नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला आहे. 

बालय्या स्वामी, कौठा (जि. हिंगोली): वसमत तालुक्यातील किन्होळा शिवारातील दोन एकरांतील उभ्या उसाला शॉर्टसर्किटने आग लागली‌. या आगीत शेतकऱ्याचे जवळपास अडीच लाख  रूपयांचे नुकसान झाले.  सदर घटना २६ जानेवारी रोजी दुपारी घडली.

किन्होळा येथील शेतात अचानक विजेचा शॉर्टसर्किट झाला असल्यामुळे ही आग लागण्याचे सांगण्यात येत आहे. खरीप हंगामात सोयाबीन, कापसाचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी आधीच चिंताग्रस्त आहे. त्यात आता दोन एकरांवरील ऊस पूर्णतः जळाल्यामुळे शेतकऱ्यावर पुन्हा रब्बी हंगामात मोठे संकट आले आहे. किन्होळा शिवारात  कलावतीबाई शंकरराव जिंतूरकर यांचे गट नंबर २२ मध्ये शेती आहे. त्यांनी त्या दोन एकरांवर उसाची लागवड केली होती. सदरील शेतातून विद्युत वाहिनीची तार गेली आहे. त्यात अचानक शॉर्टसर्किट झाल्याने उभ्या उसाला आग लागल्याचे शेतकऱ्याने सांगितले. दुपारी  आग लागली आणि पाहता पाहता आगीने एकदम रौद्ररूप धारण केले. हे पाहून परिसरातील शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. परंतु आग आटोक्यात आली नाही. त्यामुळे आगीत ऊस जळून खाक झाला. सदरील घटनेची माहिती मिळताच किन्होंळा सज्जाच्या तलाठी यू.बी. मैड यांनी सदरील नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला आहे. 

आगीमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासनाने याची भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेजारील  शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोली