शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

अचानक बसचे फुटले चाक ... !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 11:17 PM

लोकमत न्यूज नेटवर्क बासंबा : हिंगोली तालुक्यातील बळसोंड भागातील दत्तमंदिरजवळ अचानक बसचे समोरचे टायर फुटल्याची घटना शुक्रवारी घडली. बस ...

लोकमत न्यूज नेटवर्कबासंबा : हिंगोली तालुक्यातील बळसोंड भागातील दत्तमंदिरजवळ अचानक बसचे समोरचे टायर फुटल्याची घटना शुक्रवारी घडली. बस चालकाने बसवरील ताबा सुटू न दिल्याने पुढील अनर्थ टळला.दत्त मंदिराजवळ उताराच्या रस्त्यावर अचानक बसचा समोरचा टायर फुटल्याने बस ताबडतोब चालकाने थांबवली. अकोल्यावरून निलंग्याकडे जाणारी बस बळसोंड भागातील दत्त मंदिर येथे चालू असताना अचानक समोरचे चाक फुटल्याने काही अंतरावर जाताच चालकाने त्या बसवर ताबा मिळवला. अन् बसमधील प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला. बसमध्ये एकूण २५ प्रवाशी होते.या प्रवाशांना नंतर हिंगोली येथील बसस्थानकात नेऊन सोडण्यात आले. आगारात तत्काळ बस दुरूस्त केली. यावेळी चालक सुरेश पेडे, वाहक मलशेटे व अनिल पाटील यांनी बसमधील बिघाडाची दुरूस्ती केल्यानंतर पुढे रवाना झाले.दोन ट्रकची समोरासमोर धडक; सहा तास वाहतूक ठप्पकळमनुरी : येथील हिंगोली- नांदेड या मुख्य रस्त्यावर सातव महाविद्यालयाजवळ २१ डिसेंबर रोजी दोन ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने वाहतूक तब्बल साडेसहा तास जवळपास वाहतूक विस्कळीत झाली होती. २१ डिसेंबर रोजी रात्री साडेतीनच्या सुमारास हिंगोलीहून नांदेडकडे जाणाऱ्या एचआर- ५८ बी- ७३२४ व नांदेडहून हिंगोलीकडे जाणाºया एमएच-२० बीई-८१७७ या दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघाताची माहिती मिळताच सकाळी ४ वाजता पोनि जी.एस. राहिरे, फौजदार शिवसांब घेवारे व त्यांच्या सहकाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. एका ट्रकचा रॉड तुटला होता. तर दुसºया ट्रकचे समोरचे दोन्ही टायर पंक्चर झाले होते. पोलिसांनी ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. एक ट्रक दुपारपर्यंत रस्त्यावरच असल्याने वाहतुकीचा खोळंबा सुरूच होता. वाहतूक सुरळीतसाठी शिवाजी घोंगरे, सातव, गणेश सूर्यवंशी, शिवाजी दिमगुंडे, जमादार खरात आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Hingoliहिंगोलीstate transportराज्य परीवहन महामंडळ