व्यायामशाळा, क्रीडांगण विकास अनुदानासाठी प्रस्ताव सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:27 AM2021-01-22T04:27:31+5:302021-01-22T04:27:31+5:30

या योजनेंतर्गत नवीन व्यायामशाळा विकास अनुदान योजनेसाठी नवीन शासन निर्णय १६ जानेवारी २०१८ व ८ जानेवारी २०१९नुसार व्यायामशाळा साहित्य, ...

Submit proposals for gym, playground development grants | व्यायामशाळा, क्रीडांगण विकास अनुदानासाठी प्रस्ताव सादर करा

व्यायामशाळा, क्रीडांगण विकास अनुदानासाठी प्रस्ताव सादर करा

googlenewsNext

या योजनेंतर्गत नवीन व्यायामशाळा विकास अनुदान योजनेसाठी नवीन शासन निर्णय १६ जानेवारी २०१८ व ८ जानेवारी २०१९नुसार व्यायामशाळा साहित्य, खुली व्यायामशाळा करिता शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय रुग्णालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अनुदानित शाळा, महाविद्यालय, जिल्हा परिषद, सर्व शासकीय प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, आश्रमशाळा व वसतिगृह, समाज कल्याण विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या अनुदानित शाळा, शासकीय उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासनाने मान्यता दिलेल्या अनुदानित शैक्षणिक शाळा, महाविद्यालय, पोलीस कल्याण मंडळ, पोलीस विभाग, शासकीय कार्यालय इत्यादींकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. तसेच यामध्ये सेवाभावी संस्था, व्यायामशाळा, क्रीडा मंडळ, महिला मंडळे अपात्र आहेत. यांनी प्रस्ताव सादर करू नयेत.

तसेच नवीन क्रीडांगण विकास अनुदान योजनेसाठी नवीन शासन निर्णय ७ सप्टेंबर २०१९ नुसार क्रीडा साहित्य व क्रीडांगण विकासाकरिता शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था व वरील कार्यालयांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. यामध्ये सेवाभावी संस्था, व्यायामशाळा, क्रीडा मंडळ, महिला मंडळ इत्यादी हे अपात्र आहेत. तसेच युवक कल्याण विषयक अनुदान योजना २०१९ - २० या आर्थिक वर्षात शिल्लक राहिलेल्या प्रस्ताव प्राधान्यक्रमाने विचार करण्यात येणार असून, लाभार्थ्यांनी त्रुटींची पूर्तता लवकरात लवकर करावी. तद्नंतरच नवीन प्रस्तावांचा विचार करण्यात येईल. तसेच सन २०१९ -२० या आर्थिक वर्षात ज्या संस्थांना अनुदान देण्यात आले होते. अशा संस्थांनी सन २०२०-२१ करिता प्रस्ताव दाखल करताना कार्यक्रमाचा अहवाल, विनियोग प्रमाणपत्र, ऑडिट रिपोर्ट, धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे कार्यरत प्रमाणपत्र प्रस्तावासोबत सादर करावेत.

इच्छुकांसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे कार्यालयीन वेळेत विहित अर्जाचे नमुने २० ते २७ जानेवारी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत मिळतील. परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख २९ जानेवारी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे.

Web Title: Submit proposals for gym, playground development grants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.