शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 00:08 IST

पुलवामा येथे दहशतवादी संघटनेने लष्कराच्या जवानांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात ४९ जवान शहीद झाले. दहशतवादी संघटनेने भारतीय जवानांवर केलेल्या या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यात ठिक -ठिकाणी कडकडीत बंद पाळून पाकिस्तानचे पुतळेही जाळण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : पुलवामा येथे दहशतवादी संघटनेने लष्कराच्या जवानांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात ४९ जवान शहीद झाले. दहशतवादी संघटनेने भारतीय जवानांवर केलेल्या या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यात ठिक -ठिकाणी कडकडीत बंद पाळून पाकिस्तानचे पुतळेही जाळण्यात आले. मुख्य मार्गावरून रॅली काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचारी, व्यापारी तसेच महिलांचा यात समावेश होता.हिंगोली शहरातील महात्मा गांधी चौक येथे अकोला बायपास येथे युवकांनी प्रेतयात्रा काढून निषेध व्यक्त केला. तसेच अकोला बायपास येथे प्रेतयात्रा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. सकाळपासून हिंगोली शहरातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. पाकिस्तानविरोधी घोषणांनी शहर परिसर दुमदुमुन गेले होते. व्यापारी महासंघाच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते. गांधीचौक येथे शहीद वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी, व्यापारी, राजकीय पुढारी, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सेनगाव येथे बंदसेनगाव : जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे लष्करावर झालेल्या हल्ल्याचा सेनगाव शहरात निषेध करण्यात आला. हल्ल्यात शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सेनगाव शहरातील बाजारपेठ व्यापाऱ्यांनी दिवसभर कडकडीत बंद ठेवली होती.सेनगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून कॅन्डल मार्च काढण्यात आला. शहीद जवान अमर रहे च्या घोषणा देत, हल्ल्याचा निषेध करण्यात आला. येथील आप्पास्वामी प्रवेशद्वारावर श्रध्दांजली वाहून रॅलीची सांगता करण्यात आली. शनिवारी या हल्ला चा निषेध व जवानांना श्रध्दांजली करीता व्यापाºयांनी दिवसभर दुकाने बंद ठेवली. येथील बाजार समितीत शहीद जवानांना व्यापारी, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व कर्मचाºयांच्या उपस्थितीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच शिवसेनेच्या वतीने येथील आप्पास्वामी चौकात पाकिस्तानच्या प्रतिमात्मक पुतळ्याचे दहन करीन करण्यात आले. तोष्णीवाल महाविद्यालयाच्या वतीने शहरातील मुख्य मार्गावरून प्रभात फेरी काढली. विद्यार्थ्यांनी शहीद जवान अमर रहे, पाकिस्तान निषेध असो अशा घोषणा दिल्या. यावेळी तोष्णीवाल महाविद्यालय, ओमप्रकाश देवडा विद्यालय, एआरटीएम शाळेचे विद्याथीर् सहभागी झाले.बाळापुरात पुतळा जाळलाआखाडा बाळापूर : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून आखाडा बाळापुर व परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला. बाळापूर येथील नवीन बसस्थानकजवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकात व शेवाळा रोडवरील मिलन चौकात पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. शनिवारी सकाळी पासून बाळापुर येथील सर्व बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. यात फळविक्रेते व चहा टपरीवालेही बंदमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे परिसरात सर्वत्र शुकशुकाट पहावयास मिळाला. नवीन बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी चौकात सर्व एकत्रित मिळून पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले तसेच शेवाळा रोडवरील मिलन चौकातही मुस्लिम बांधवांनी पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून पाकिस्तान मुदार्बाद अशा घोषणा दिल्या.औंढा नागनाथ : दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या वीर जवानांना औंढा नागनाथ येथे श्रद्धांजली वाहण्यात आली. हा कार्यक्रम औंढा शहरातील स्वर्गीय मीनाताई ठाकरे चौकामध्ये घेण्यात आला. यावेळी शहीदांना श्रद्धांजली यांचे बॅनर लावून बॅनर च्या समोर भारत मातेचा फोटो लावून श्रद्धांजली व रांगोळी काढण्यात आली. यावेळी पोनि कुंदनकुमार वाघमारे, सुरजितसिंग ठाकूर, सचिन देव, मुंजाजी गोबाडे, दिपाली पाटील, जयाताई देशमुख, विजयमाला मुळे, आलका कुरवाडे, तेजकुमार झांझरी, सचिन देव, बालाजी सातव, पांडुरंग पाटील, सुनील पुराणिक, सुरेश गिरी, अनिल देशमुख, अ‍ॅड.शकर देशपाडे, सुनील देशमुख, गणेश देशमुख, राम मुळे, गणेश कुरवाडे, अरुण देशमुख, सतीश चोंडेकर, जकी काजी, गंगाधर जावळे, मनोज आग्रवाल, गणेश कुरवाडे, साहेबराव देशमुख, शाहु ईप्पर आदी उपस्थित होते.प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनदहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ औंढा येथे दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून तीव्र शब्दात शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद-आतंकवाद मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष बांगर, राम कदम, साहेबराव देशमुख, जी. डी. मुळे, अनिल देव, मनोज देशमुख, गणेश कुरवाडे, राम मुळे, विष्णू जाधव, सतीश चोंडेकर, महेश खुळखुळे, प्रदीप कनकुटे, राहुल दंतवार, अनिल कनकुटे, राजू वाकोडे, साई गोरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :SoldierसैनिकDeathमृत्यू