शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

...तर मद्य विक्रेत्यांवर कठोर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 00:42 IST

लोकसभा निवडणुकीदरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्ह्यात मद्यविक्रीवर बंदी घातली आहे. शहर व जिल्ह्यात मतदानापूर्वी दोन दिवस व मतदानाच्या दिवशी, अशी तीन दिवस दारूविक्री करता येणार नाही.त्यामुळे जिल्ह्यातील मद्यविक्रीची सर्व दुकाने या काळात बंद ठेवण्याचे आदेश आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : लोकसभा निवडणुकीदरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्ह्यात मद्यविक्रीवर बंदी घातली आहे. शहर व जिल्ह्यात मतदानापूर्वी दोन दिवस व मतदानाच्या दिवशी, अशी तीन दिवस दारूविक्री करता येणार नाही.त्यामुळे जिल्ह्यातील मद्यविक्रीची सर्व दुकाने या काळात बंद ठेवण्याचे आदेश आहेत.लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठी १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या मतदान व मतमोजणीच्या कालावधीत जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी आणि जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवणार नाही, तसेच अनुचित प्रकार घडू नये, याबाबत खबरदारी घेत मुंबई मद्य निषेध कायदा, १९४९ चे कलम १४२ (१) अन्वये मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. तर १६ एप्रिल रोजी (सायंकाळी ५.३० नंतर), दिनांक १७, १८ एप्रिल २०१९ व २३ मे रोजी संपूर्ण दिवस संपूर्ण जिल्ह्यात मद्य विक्रीसाठी मद्यविक्रीच्या अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. निवडणूक काळात मद्यविक्रीच्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे यावर लक्ष ठेवण्याचे काम राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून केले जाणार आहे. जिल्ह्यात आचारसंहिता लागू केल्यानंतरही अवैधरित्या दारूविक्री करणाऱ्यांविरूद्ध कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आदर्श आचारसंहितेत मद्याची विक्री करणाऱ्यांविरूद्ध राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने कारवाई करून अनेकांना अटक केली. निवडणुकीच्या काळात मद्याचा अतिरिक्त साठा केला जाऊ नये, याबाबत खबरदारी घेण्यात आली आहे. मतदानाच्या अगोदर दोन दिवस आणि मतदानाच्या दिवशी मद्य विक्री करताना आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. कायद्याचे उल्लंघन करणाºयांविरूद्ध धडक मोहीम राबवून करडी नजर ठेवली जाणार आहे.जिल्ह्यात ३९ परवानाधारक देशी दारूची दुकाने आहेत. तर ९१ बार असून ४ वाईन शॉप आहेत. तसेच बियरशॉपींची ४० च्या वर संख्या आहे. अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. शिवाय याबाबत संबधित दुकाचालकांना कळविण्यात आले आहे. लोकसभा निवडणूक दरम्यान आदर्श आचार संहितेत अवैधरित्या दारू विक्री करणाºयांवर पथकाकडून धडक कारवायाही करण्यात आल्या. संबधित आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल करून दारूसाठा जप्त केला. तर रसायनही नष्ट करण्यात आले.दुसºया टप्यात हिंगोली लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. निवडणूक निर्भपणे व मुक्त वातावरणात पार पडावी यासाठी मद्य विक्रीस मनाई करण्यात येते. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील दुकाने बंदचे आदेश आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीPoliceपोलिस