लोकमत न्यूज नेटवर्कडोंगरकडा : भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ ३ जानेवारी रोजी डोंगरकडा येथील व्यापाºयांनी दुकाने बंद ठेवून महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिला. तसेच महामार्गावर भारिप-बसमंच्या वतीने सकाळी १0 वाजता रास्ता रोको करण्यात आला.भीमा कोरेगाव येथील दंगलीची सीआयडीमार्फत चौकशी करून समाजकंटकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, हल्लेखोरांना तत्काळ अटक करावी, यासह इतर घटनेचा निषेधाचे निवेदन आखाडा बाळापूरचे पो.नि. व्यंकट केंद्रे यांना देण्यात आले. निवेदनावर दत्ता रामजी पंडित, यशवंत पंडित, रविकुमार पंडित, रमेश पंडित, तुषार पंडित, राजू पंडित, बाळू पंडित, माया पंडित, प्रांजली पंडित, कविता पंडित, जयाशीला जोगदंड, शीला गवळी, पंचशीला पंडित, चंद्रकला पंडित, आशा पंडित, दत्ता पाईकराव, साहेबराव सितळे, रमेश सितळे, जगन गवळी, संजय बहात्तरे आदींच्या स्वाक्षºया आहेत.कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. रास्ता रोको शांततेत झाला. यावेळी वाहनाच्या सहा कि.मी.पर्यंत रांगा लागल्या होत्या.
डोंगरकड्यात रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:24 IST