शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अजूनही दावे-प्रतिदावेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 23:26 IST

कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर बाजार समितीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला १0 तर भाजप-शिवसेना युतीला ८ जागा मिळाल्या आहेत. मात्र तरीही युतीकडून सत्तास्थापनेचा दावा केला जात असून आता यात भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ.तान्हाजी मुटकुळेही सभापती युतीचाच होणार असल्याचे म्हणू लागले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर बाजार समितीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला १0 तर भाजप-शिवसेना युतीला ८ जागा मिळाल्या आहेत. मात्र तरीही युतीकडून सत्तास्थापनेचा दावा केला जात असून आता यात भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ.तान्हाजी मुटकुळेही सभापती युतीचाच होणार असल्याचे म्हणू लागले आहेत.तसे या निवडणुकीपासून आ.मुटकुळे दूरच राहिल्याचे चित्र होते. त्यांनी या रणांगणात थेट न उतरता बाहेरूनच आढावा घेतला. याचप्रमाणे खा.राजीव सातव यांनीही शिलेदारांच्या खांद्यावर धुरा सोपवून शेवटच्या टप्प्यात काही गावांचा दौरा तेवढा केला. मात्र आता खा.सातव सक्रिय झाले आहेत. विरोधकांच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांनी पक्षीय मंडळीला सावध राहण्याचा सल्ला दिला. तसेच निवडणुकीप्रमाणे आता निवडीची बैठक हलक्याने घेऊ नका. यात गांभिर्याने सामोरे जाण्यास सांगितले. दुसरीकडे आ.मुटकुळे यांनीही बाजार समितीत युतीचाच सभापती होणार असल्याचे छातीठोकपणे सांगत वेगळाच रंग भरण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे काँग्रेस-राकाँने बहुतांश जणांना सुरक्षितस्थळी हलविण्याची तयारीही केली. काहींना तर हलविलेही आहे. या निवडणुकीत भाजपचे खा.शिवाजी माने यांची भूमिकाही तेवढीच महत्त्वाची राहणार आहे. पुतणे दत्ता माने यांच्यासाठी त्यांचा फोडाफोडीचा प्रयत्न राहणार आहे. मात्र काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांनी मुलगा दत्ता बोंढारे यांच्यासाठी टाईट फिल्डिंग लावल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीत भाजपकडून माजी आ.गजानन घुगे यांनी तर सेनेकडून जिल्हाप्रमुख संतोष बांगर, राजेंद्र शिखरे आदींनी रणनीती आखली होती. राकाँचे आ.रामराव वडकुते, मनीष आखरे, कदम आदींनी मेहनत घेतली. मात्र या सर्वच पक्षांना अंतर्गत गटबाजीत काही जागा गमवाव्या लागल्या. तर काही अनपेक्षित मिळाल्या.निवडणुकीपूर्वीच्या समीकरणांपेक्षा नंतरची समीकरणे जुळविणे युतीला अवघड जाणार आहे. जसा युतीच्या नेत्यांना आपल्याच पक्षाच्या लोकांनी धोका दिला. त्यापेक्षा जास्त आघाडीच्या मुळावर ही बाब उठली. आगामी निवडणुकांची ही नांदी असल्याचे चित्र आहे. जो-तो पोखरायला निघाला असला तरीही आघाडीला वर्चस्व राखता आले, हेही तेवढेच खरे. मात्र यामुळे सावध होण्यास वेळही मिळाला असून आगामी काळात याचे राजकीय पडसाद दिसल्यास नवल नाही. सगळेच आलबेल नसल्याचे चित्रही यामुळे समोर आले.या निवडणुकीत सभापती निवडीचा कार्यक्रमही अजून जाहीर झाला नाही. तरीही एकमेकांवर नजर ठेवणे सुरू आहे. तर आतापासून संचालक सहलीवर पाठवणेही खर्चिक ठरणार आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकMarket Yardमार्केट यार्ड