अनेक वाहनचालक वाहन जुने असो की नवे भरधाव वेगाने चालवितात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढते. काही वाहनचालक तर स्वत:बरोबर इतरांनाही दुखापत करतात. जिल्ह्यातील वाहतूक शाखेने जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० या वर्षात ५ हजार ७२२ वाहचालकांक़डून १ हजार रुपये या प्रमाणे दंडापोटी ५७ लाख २२ हजार रुपये वसूल केले. वाहनांचा वेग हा नेहमी ५० वर कधी जावू नये, अशा सूचना वारंवार शहर वाहतूक शाखेच्या वतीने देण्यात आलेल्या असतानाही काही वाहचालक मात्र त्याचे पालन करत नाहीत. त्यामुळे ‘स्पीडगन’ ने त्याची मोजणी करुन वेगाने वाहने चालविणाऱ्यांना दंड थोटावला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
प्रतिक्रिया
वाहन जुने असो अथवा नवीन. वाहनचालक तसेच वाहनमालकांनी आपल्या वाहनाचा वेग ७० वर जावू देवू नये. वेगाने वाहन चालविणे हे धोक्याचेच असल्याने इतरांनाही त्यामुळे जीव गमवावा लागतो. कधी-कधी अपघातामुळे अपंगत्वही येते. तेव्हा वाहनचालकांनी वेगासंदर्भात काळजी घ्यावी.
ओमकांत चिंचोलकर, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, हिंगोली
वाहनांचा वेग कमीच ठेवणे अद्य कर्तव्य
नगर पालिलका क्षेत्र असो की महानगरपालिका क्षेत्र. वाहनांचा वेग कमी म्हणजे ५० असावा. (वेग) जास्त वेग असेल तर वाहन हे अपघाताला कारणीभूत ठरते. भर वस्तीत पादचारी हे कधी फुटपाथवरुन चालतात तर कधी फुटपाथ सोडून चालात. तेव्हा वेगाने येणाऱ्या वाहनाला वेग आवरणे कठीण होऊन बसते. २०२० या वर्षात अतीवेगाने चालणाऱ्या वाहनांचा वेग ‘स्पीडगन’ने मोजला. रस्त्याच्या कडेला स्पीडगन’ लावून एक पदरी, दुपरी, तीपदरी रस्त्यावरील वाहनांचा वेग मोजला. ही कारवाई यापुढेही चालूच राहणार असून वाहनाचा वेग चालकांनी कमीच ठेवण्याचे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.