शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

साहेब, टँकर नको; पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवा; खैरखेडा ग्रामस्थांचा झेडपीत ठिय्या

By रमेश वाबळे | Updated: April 5, 2024 17:12 IST

पाण्यासाठी २ कि.मी.ची पायपीट; खैरखेडा ग्रामस्थांचा जिल्हा परिषद सीईओंच्या दालनासमोर ठिय्या

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील खैरखेडा येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. परंतु, या योजनेंतर्गत पाणी मिळणे दूरच, वर्षभराचा कालावधी उलटूनही योजनेचे काम सुरू झाले नाही. परिणामी, ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, संतप्त ग्रामस्थांनी ५ एप्रिल रोजी रिकामे हंडे घेऊन थेट जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे दालन गाठत ठिय्या आंदोलन केले.

खैरखेडा येथे जल जीवन मिशन अंतर्गत ८५ लाख रूपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. या योजनेंतर्गत गावाला पाणीपुरवठा होईल आणि गावची पाणीटंचाई दूर होईल, अशी आशा होती. मात्र, योजना मंजूर होऊन वर्षभराचा कालावधी उलटला तरी काम सुरू झालेले नाही. परिणामी, ग्रामस्थांना प्रखर उन्हात पाण्यासाठी २ कि.मी.ची पायपीट करावी लागत आहे. एकीकडे शासनाची योजना मंजूर झाली असतानाही पाण्यासाठी पायपीट थांबत नसल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी जि. प. कार्यालय गाठून हा प्रश्न थेट मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मांडला. गावचा पाणीप्रश्न तत्काळ सोडवावा, संबंधित कंत्राटदाराविरुद्ध कारवाई करावी व पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली. मागणीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले.

यावेळी अमोल मोरे, दीपक खराटे, प्रवीण मोरे, रामेश्वर जाधव, विठ्ठल गव्हाणे, दत्तराव गव्हाणे, केशव शिंदे, देवीदास मोरे, डिगांबर खराटे, साहेबराव मोरे, गणेश मोरे, माणिक गरड, झनक जाधव, निर्मला फड, सत्यभामा मोरे, प्रमिला इंगळे, लताबाई जाधव, शेवंताबाई कुऱ्हे, भागुबाई मोरे, नंदाबाई जाधव, संगीता गरड यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

साहेब, टँकर नको; पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवा...खैरखेडा ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांच्याकडे पाणीप्रश्न मांडताच त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात टँकरची व्यवस्था करण्यात येईल, असे सांगितले. परंतु, पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी करीत रिकामे हंडे घेऊन शेंगुलवार यांच्या दालनासमोरच ठिय्या मांडला. जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत जि.प. कार्यालयातच बसून राहणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दुपारी ४ वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच होते.

टॅग्स :HingoliहिंगोलीWaterपाणी