शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत लव्ह जिहाद व बेकायदेशीर धर्मांतरणाविरोधात मूकमोर्चा

By विजय पाटील | Updated: December 8, 2022 13:21 IST

'देशात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करून दोषींवर कठोर कारवाईची तरतूद करावी'

हिंगोली : हिंदू धर्मातील अनेक व्यक्तींचे बेकायदेशीरपणे विविध आमिषे दाखवून धर्मांतरण केले जात असून हिंदू मुलींना लव्ह जिहादच्या माध्यमातून पळवून नेवून त्यांची हत्या केली जात असल्याचा आरोप करीत हिंदू धर्मरक्षक हिंगोलीकरांच्यावतीने हिंगोलीत आज भव्य मूकमोर्चा काढण्यात आला.

याबाबत मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनात म्हटले की, पैसे, नोकरी, लग्न आदीचे आमिष दाखवून अथवा धमकावत इतर धर्मामध्ये धर्मांतरण केले जात आहे. तर वायत आलेल्या तरुण हिंदू मुलींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाच्या आमिषाने त्यांचे धर्मांतरण केले जात असल्याचीही अनेक प्रकरणे समोर आली आहेत. या लव्ह जिहादच्या माध्यमातून फसवणूक होत आहे. या मुलींचा देश विघातक कृती व आतंकवादी कारवायांसाठी वापर केला जात आहे. तसेच अशा मुलींची हत्या केली जात आहे. अशी अनेक प्रकरणे सिद्ध होऊनही दखल ोतली जात नाही. त्यामुळे हिंदू समाजाच्या धार्मिक स्वातंत्र्यावर तसेच देश सुरक्षिततेवर संकट येऊ शकते, असेही निवेदनात म्हटले.

हिंगोलीतील गांधी चौक येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, इंदिरा गांधी चौक या मार्गाने हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यात महिला व मुलींचाही लक्षणीय सहभाग असल्याचे दिसून आले. यात विविध पक्ष, संघटनांच्या मंडळींनीही सहभाग घेतला होता.

या आहेत प्रमुख मागण्यायासाठी देशात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करून दोषींवर कठोर कारवाईची तरतूद करावी, यासाठी विशेष न्यायालये नेमावीत, या विषयासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करावा, प्रलोभण, धमकावणे अथवा फसवणुकीने धर्मांतरण रोखण्यासाठी कायद्याने बंदी आणावी, गोवंश हत्याबंदी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, दिल्ली येथील श्रद्धा वालकर हिचा अफताब पुनावाला या जिहादीने केलेल्या हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवून त्यास भरचौकात फाशी द्यावी, संपूर्ण देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करावा या प्रमुख मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.

टॅग्स :HingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारी