शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

औंढ्यात दुकान फोडून २ लाखांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 01:09 IST

येथील हिंगोली राज्य मार्गावर असलेल्या इलेक्ट्रिकल्स् हे दुकान फोडून त्यामधून २ लाख रुपयांच्या वर कॉपर धातूची चोरट्यांनी चोरी केल्याची घटना रविवारी २ च्या सुमारास घडली आहे. या बाबत पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आजूबाजूच्या सीसीटीव्हीमार्फत पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : येथील हिंगोली राज्य मार्गावर असलेल्या इलेक्ट्रिकल्स् हे दुकान फोडून त्यामधून २ लाख रुपयांच्या वर कॉपर धातूची चोरट्यांनी चोरी केल्याची घटना रविवारी २ च्या सुमारास घडली आहे. या बाबत पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आजूबाजूच्या सीसीटीव्हीमार्फत पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.औंढा नागनाथ येथे विजय अंकुश गरड यांचे राज्य रस्त्यालगत शिवशंकर इलेक्ट्रीकल व मशिनरीचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे ते सोमवारी दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाच्या शटरचे दोन्ही कुलूप तोडलेले आढळून आले. आतमध्ये प्रवेश केला असता त्यांना दुकानातील महागड्या कॉपरच्या तारा व इतर साहत्यासह गल्ल्यातील नगदी १६ हजार रुपये चोरी झाल्याचे निदर्शनास आले. जवळपास ९ क्विंटल कॉपर चोरीस गेल्याचे उघड झाले असून, त्यांची किंमत २ लाखांच्या वर आहे. त्यामुळे विजय गरड यांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठून घडलेल्या प्रकाराबाबतची फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी चोरट्यांनी तत्काळ माग घेण्यासाठी हिंगोली येथील ठसेतज्ज्ञांच्या पथकास पाचारण केले. या दुकानात पंचनामा करून ठसे घेण्यात आले आहेत.या दुकानाच्या आजूबाजूच्या ठिकाणी सीसीटीव्हीमध्येही बाब कैद झाल्याची पोलिसांना माहिती मिळाली असून, पोनि वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार राहुल बहुरे तपास करीत आहेत. या आठवड्यात चोरीची ही दुसरी घटना असल्याने शहरातील व्यापाऱ्यांत घबराट निर्माण झाली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी