शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! 'या' गावात सलग तीन दिवसांत तीन तरुणांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 13:22 IST

In Hingoli District three youths commit suicide in three days in a row हिंगोली जिल्ह्यातील बोराळा येथे आत्महत्या सत्र सुरूच

ठळक मुद्देतिसऱ्या दिवशीही गळफास लावून तरुणाची आत्महत्यातीनही घटना या वेगवेगळ्या कारणांनी घडल्या.

कौठा ( हिंगोली ) : वसमत तालुक्यातील बोराळा येथील आत्महत्येचे सत्र सुरूच असून, सलग तिसऱ्या दिवशीही एका तरुणाच्या आत्महत्येची घटना घडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. तीनही घटना या वेगवेगळ्या कारणांनी घडल्या. यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.

बोराळा येथे  ९ , १०, व  ११ आॅक्टोबर रोजी सलग तिघांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याने हे गाव चर्चेत आले आहे. ९ आॅक्टोबर रोजी प्रभाकर जाधव यांनी आत्महत्या केली. तर १० आॅक्टोबर रोजी येथील संतोष खराटे या युवकाने आत्महत्या केली. या दोन्ही घटना ताज्या असतानाच सलग तिसऱ्या दिवशी ११ आॅक्टोबर रोजीही रात्रीला येथील राजू बाबुराव गंगतिरे वय २४ वर्षे या युवकाने गळफास घेऊनच आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री ९ :३० च्या पूर्वी रोड लगतच्या शेतातील बोरीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. प्रकाश गंगतिरे यांच्या खबरी वरून वसमत ग्रामीण ठाण्यात या  घटनेची नोंद करण्यात आली. 

अतिपावसांमुळे शेताचे अतोनात नुकसान झाल्याने या विवंचनेतून आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आलेली आहे. घटनास्थळी वसमत ग्रामीण पोलिसांनी भेट देऊन पंचनामा करण्यात आला. पुढील तपास सपोनि बी.आर. बंदखडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत. सलग तीन दिवसांत तीन जणांनी विशेषत: तिन्ही युवकांनी आपले जीवन संपवल्याने बोराळा गावावर दु:खाचे सावट निर्माण झाले आहे.

शुक्रवार, शनिवार आणि रविवारी आत्महत्या बोराळा येथील प्रभाकर जाधव (३२) यांनी अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने व बँकेचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेतून राहत्या घरी ९ आॅक्टोबर रोजी सांयकाळी ६ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली तर दुसऱ्या घटनेत बोराळा येथील संतोष बालाजी खराटे (२२) याने १० आॅक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, धमक्यांच्या त्रासाला कंटाळूनच संतोषने आत्महत्या केली, असा आरोप मयताची आई कांताबाई यांनी केला आहे. या घटनेबाबत मयताची आई कांताबाई खराटे यांनी वसमत ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, बोराळा येथील बाजीराव जाधव,अण्णा जाधव, शिवाजी जाधव, तातेराव जाधव (सर्व रा. बोराळा) यांनी संगनमत करून मयताच्या आई कांताबाई यांनी शेतावर दावा का केला, म्हणून फिर्यादीच्या मुलास धमक्या दिल्या. त्यामुळे नेहमीच्या त्रासाला कंटाळूनच संतोषने आत्महत्या केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक बळीराम बंदखडके, भुजंग कोकरे, बालाजी मिरासे, भुरके यांनी भेट देऊन पंचनामा केला.

टॅग्स :Suicideआत्महत्याCrime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोलीFarmerशेतकरी