शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! महागड्या मोबाईलच्या वेडापायी अल्पवयीन मुलाचा चक्क बँक फोडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 18:05 IST

बँक ऑफ इंडियाची शाखा फोडण्याच्या प्रयत्नांतील अल्पवयीन मुलास पोलिसांनी घेतले ताब्यात

हिंगोली : महागड्या मोबाईल घेण्यासाठी एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने चक्क बँक ऑफ इंडियाची शाखा फोडण्याचा प्रयत्न केला. ही घटना हिंगोली शहराजवळील गंगानगर कारवाडी भागात २५ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.

हिंगोली शहराजवळील गंगानगर, कारवाडी भागात नांदेड रोडवर बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. बँकेत ग्राहकांची संख्याही मोठी आहे. २४ डिसेंबरच्या रात्री बँकेच्या पाठिमागील बाजूस भिंत फोडण्याचा आवाज येत असल्याने परिसरातील नागरिकांनी बँकेकडे धाव घेतली. यावेळी बँक फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास आले. याच वेळी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी या भागत गस्त घालत होते. त्यांनीही बँकेकडे धाव घेतली. 

दरम्यान, नागरिक व पोलीस येत असल्याचे दिसताच चोरट्याने येथून पळ काढला. तसेच पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, उप विभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आर.एन. मळघने, उप निरीक्षक अच्युत मुपडे, पोलीस हवालदार जी.के. पोकळे, रविकांत हारकाळ, आकाश पंडितकर आदींच्या पथकाने धाव घेत चोरट्याचा शोध सुरू केला. 

यावेळी चोरटा सावरखेडा गावाकडे पळाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे संपर्क साधला. त्या ठिकाणी रस्त्याच्या कामावर असलेल्या मजूरांनी त्यास पकडून ठेवले. त्यानंतर चोरट्यास पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी अधिक चौकशी केली चोरटा अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. तसेच त्याने मोबाईलसाठी पैसे नसल्यामुळे चोरीचा प्रयत्न केल्याचे सांगितले. याप्रकरणी कुलभूषन देशमुख यांच्या फिर्यादीवरून १६ वर्षीय अल्पवयीन मुलावर हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. पोलीस हवालदार जी.के. पोकळे तपास करीत आहेत.

आईसोबत येत बँकेची केली पाहणीहिंगोली तालुक्यातील टाकळी (टीएन) येथील अल्पवयीन मुलगा आहे. तो नांदेड जिल्ह्यातील शाळेत शिक्षण घेतो. शिष्यवृत्तीसाठी खाते काढण्यासाठी काही दिवसांपूर्वीच तो आई सोबत बँकेत आला होता. यावेळी बँकेत खूप पैसे असल्याची खात्री त्याला पटली. त्यामुळे किमती मोबाईल खरेदी करण्यासाठी त्याने बँकेवर डल्ला मारण्याचा निर्णय घेतला. २५ व २६ डिसेंबर अशी दोन दिवस सुट्टी असल्याने बँकेकडे कोणीही फिरकणार नाही. हा अंदाज घेऊन २४ डिसेंबरच्या रात्री तो लोखंडी रॉड घेऊन बँकेच्या मागे लपला होता.

टॅग्स :theftचोरीSmartphoneस्मार्टफोनHingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारी