शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

‘टोकाई’ कारखान्यावर पुन्हा शिवाजीराव जाधवांचे वर्चस्व; पॅनलने १७ पैकी १६ जागा जिंकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2023 19:04 IST

वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखाना निवडणुकीत शेतकऱ्यांची ऊस बिले थकली, ऊस गाळपासाठी गेला नाही यासह इतर मुद्द्यांवर प्रचार रंगला होता

- इस्माईल जाहागिरदारवसमत (जि. हिंगोली): टोकाई सहकारी साखर कारखान्याच्या १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ॲड. शिवाजीराव जाधव यांच्या शेतकरी विकास पॅनलने १६ जागांवर विजय मिळवला. तर टोकाई शेतकरी विकास पॅनलला एक जागेवर समाधान मानावे लागले. अटीतटीच्या निवडणुकीत ऊस उत्पादक शेतकरी सभासदांनी ॲड. शिवाजीराव जाधव यांच्यावर विश्वास ठेवत ‘टोकाई’ पुन्हा त्यांच्या ताब्यात दिला.

वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखाना निवडणुकीत शेतकऱ्यांची ऊस बिले थकली, ऊस गाळपासाठी गेला नाही यासह इतर मुद्द्यांवर प्रचार रंगात आला होता. दरम्यान, निवडणुकीत प्रचार आरोप-प्रत्यारोपही झाले. २ जुलै रोजी झालेल्या मतदानाची ४ जुलै रोजी जुने तहसील कार्यालय परिसरात असलेल्या धान्य गोडावूनमध्ये सकाळी ८ ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत मतमोजणी पार पडली. १७ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात उभे होते. निवडणुकीत सोसायटी मतदारसंघात टोकाई शेतकरी विकास पॅनलचे खोब्राजी नरवाडे यांनी २० मते घेत विजय मिळविला. तर ॲड. शिवाजीराव जाधव शेतकरी विकास पॅनलचे विठ्ठल भोसले यांना १४ मते पडली असून ते पराभूत झाले. 

कुरुंदा गटातील उमेदवार मनोज कन्नेवार (मते २७९०), शिवाजी इंगोले (२८८७), गिरगाव गट सुनील बागल (२६८२), रावसाहेब कऱ्हाळे (२८०३), विलास नादरे (२७८८), कौठा गट मुंजाजीराव जाधव (२५५०), ॲड. शिवाजीराव जाधव (२७६८), दांडेगाव गट शिवाजी सवंडकर (२८४६), जगदेवराव साळुंके (२७४७), कोंढूर गट साहेबराव पतंगे (२९१६), गजानन जाधव (३२०८), अनु. जाती जमाती रणधीर तेलगोटे (२९७२), महिला राखीव -अर्चना सिद्धेवार (२७००), बायनाबाई कऱ्हाळे (२६९८), इतर मागास प्रवर्ग -देवानंद नरवाडे (२५८१), विभजाविमाप्र- विश्वनाथ जमरे (२९३२) हे विजयी झाले आहेत.

निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार...मुंजाजी इंगोले, आंबादास भोसले, सुनील नादरे, विजय नरवाडे, अनिरुद्ध कऱ्हाळे, अशोक खराटे, साहेबराव जाधव, प्रभाकर जगताप, अच्युत नादरे, कुंडलीक देशमुख, निळकंठ शिंदे, सुरेश नागरे, कोंडबा लोखंडे, इंदुमती देशमुख, अन्नपूर्णा दासरे, अश्विनी खराटे, कुसूम गोरे, बबनराव कदम, गणपत तागडे, संभाजी बेंडे हे उमेदवार पराभूत झाले आहेत.

मतमोजणी प्रक्रिया शांततेत...निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ सचिन खलाळ, तहसिलदार शारदा दळवी, प्रभारी सहायक निबंधक किशोर धुतमल यांच्या नेतृत्वात निवडणुक मतमोजणी प्रक्रीया शांततेत पार पडली, यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी संदिपान शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि चंद्रशेखर कदम यांनी तगडा बंदोबस्त तैनात ठेवला होता,

पिता-पुत्राने मारली बाजी...टोकाई शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार जिपचे माजी उपाध्यक्ष अंबादासराव भोसले व ॲड. शिवाजीराव जाधव शेतकरी विकास पॅनलचे विठ्ठल भोसले हे दोघे भाऊ प्रतिस्पर्धी पॅनलचे उमेदवार होते. दोघांचाही पराभव झाला, तसेच टोकाई शेतकरी विकास पॅनलमध्ये इंदुबाई देशमुख व त्यांचे पती पुंडलिक देशमुख या पती-पत्नीचा पराभव झाला. पुत्र ॲड. शिवाजीराव जाधव व त्यांचे वडिल मुंजाजीराव जाधव यांचा विजय झाला तर बबनराव कदम यांचा अवघ्या ३० मतांनी पराभव झाला.

टॅग्स :HingoliहिंगोलीSugar factoryसाखर कारखाने