शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

निराधार धडकले सेनगाव तहसीलवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 01:10 IST

येथील तहसील कार्यालयावर बुधवारी तालुका काँग्रेसच्या वतीने निराधार, शेतकरी, शेतमजुरांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मोठ्या संख्येने निराधार, शेतमजूर सहभागी झाले होते.

सेनगाव : येथील तहसील कार्यालयावर बुधवारी तालुका काँग्रेसच्या वतीने निराधार, शेतकरी, शेतमजुरांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मोठ्या संख्येने निराधार, शेतमजूर सहभागी झाले होते.तालुक्यात निराधार योजनेची सूक्ष्म तपासणी करून अनेक अनेक निराधार लाभार्थ्यांचे अनुदान प्रशासनाने बंद केले आहे. त्यामुळे निराधार लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा लाभार्थ्यांना त्यांचे अनुदान पूर्ववत चालू करावे. तालुक्यात दुष्काळ पडल्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत करावी, स्थलांतर रोखण्यासाठी रोजगार हमी योजनेची कामे तातडीने चालू करून मजुरांच्या हाताला काम द्यावे आदी मागण्यांकरिता २१ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता येथील तहसील कार्यालयावर हा मोर्चा धडकला.हा मोर्चा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष बोंढारे, तालुकाध्यक्ष विनायक देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. यावेळी ओबीसी जिल्हाध्यक्ष सतीश खाडे, जिल्हा उपाध्यक्ष सुधीरअप्पा सराफ, डॉ. रवि पाटील, श्यामराव जगताप, अशोक सरनाईक, बाबूराव बांगर, डॉ. राजेश भोसले, विलास गोरे, बंटी नागरे, श्रीरंग कायंदे, डॉ. माणिक देशमुख, अजय विटकरे, जनार्दन कोरडे आदीसह मोठ्या संख्येने निराधार लाभार्थी महिला, कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर सहभागी झाले होते. यावेळी तहसीलदार वैशाली पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निराधारांचे बंद झालेल्या अनुदान पूर्ववत चालू न केल्यास काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी तालुकाध्यक्ष देशमुख यांनी दिला. बंद झालेले अनुदान चौकशी करून चालू करण्याचे आश्वासन यावेळी तहसीलदार पाटील यांनी मोर्चेक-यांना दिले.उद्याही मोर्चा : पुन्हा दोन गटांचे अस्तित्वसेनगाव तहसीलवर आज काँग्रेसच्या एका गटाने मोर्चा काढला. उद्या पुन्हा दुस-या गटाचे आंदोलन आहे. विशेष म्हणजे दोन्ही गटांनी निराधारांच्या प्रश्नालाच प्राधान्य दिले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसमध्येच अंतर्गत स्पर्धेला उधाण आले आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांना कमी लेखण्याची कोणतीच सोडली जात नाही. त्यामुळे हे वाद आगामी काळात आणखी बरेच रंग दाखवतील, असे चित्र आहे. पहिल्यांदाच या वादाला तोंड फुटले असेही नाही. यापूर्वीही अनेक किस्से घडले आहेत. त्यात आणखी एकाची भर पडली आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीagitationआंदोलनcongressकाँग्रेस