शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

सातव यांना चौथ्यांदा संसदरत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 23:50 IST

हिंगोलीचे खा. राजीव सातव यांना संसदेतील अष्टपैलू कामगिरीबद्दल सलग चौथ्यांदा संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला असून १९ जानेवारीला वितरण होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : हिंगोलीचे खा. राजीव सातव यांना संसदेतील अष्टपैलू कामगिरीबद्दल सलग चौथ्यांदा संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला असून १९ जानेवारीला वितरण होणार आहे.चेन्नई येथील प्राईम पॉइंट फाऊंडेशनच्या वतीने २००९ पासून दरवर्षी लोकसभेतील विविध कामगिरीसाठी चार जणांना हा पुरस्कार देण्यात येतो. लोकसभेच्या हिवाळी अधिवेशन २०१९ पर्यंत खा.सातवांनी ८१ टक्के उपस्थिती लावत ११७ वेळा चर्चेची सुरुवात, ८८ वेळा प्रत्यक्ष चर्चेत सहभाग नोंदवला. तारांकित व अतारांकित असे १०७५ प्रश्न उपस्थित करुन २३ खाजगी सदस्य विधेयकही मांडले. या अष्टपैलू कामगिरीवरुन खा. सातव यांची निवड झाली आहे. या समितीत केंद्रीय गृहराज्यमंत्री खा.हंसराज अहीर, केंद्रीय राज्यमंत्री खा.अर्जुन मेघावाल, शिवसेनेचे खा.आनंदराव अडसूळ यांचा समावेश आहे. तामिळनाडू येथे राजभवनात येत्या १९ जानेवारी रोजी पारितोषक वितरण सोहळ्यास राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन मेघवाल, राज्यमंत्री पी.पी चौधरी, डॉ.भास्कर राममूर्ती, अध्यक्ष के.श्रीनिवास आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.देशात सातव दुसऱ्या क्रमांकावरलोकसभेतील ५४३ खासदारांच्या कामकाजाचे मूल्यांकनात हिंगोलीचे खा.राजीव सातव देशात आपल्या अष्टपैलू कामगिरीवरून दुसºया क्रमांकावर असून, सातव यांना १२१५ अंक मिळाले आहे. पहिल्या क्रमांकावर १२७२ अंक मिळवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा.सुप्रियाताई सुळे तर तिसºया क्रमांकावर १२११ अंक मिळवून शिवसेनेचे खा.श्रीरंगअप्पा बारणे आहेत.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेस