शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

हिंगोली बाजार समितीत संत नामदेव पॅनलची आघाडी

By विजय मुंडे  | Updated: April 29, 2023 12:48 IST

निकाल जाहीर झालेल्या सातपैकी पाच जागा या पॅनलने जिंकल्या असून सेवा सोसायटीच्या निवडणुकीतही उमेदवार आघाडीवर आहेत.

हिंगोली : येथील बाजार समितीच्या निवडणुकीत संत नामदेव शेतकरी विकास पॅनलची विजयाकडे वाटचाल सुरू आहे. निकाल जाहीर झालेल्या सातपैकी पाच जागा या पॅनलने जिंकल्या असून सेवा सोसायटीच्या निवडणुकीतही उमेदवार आघाडीवर आहेत.

हिंगोली बाजार समितीत ग्रामपंचायत मतदारसंघात संत नामदेव शेतकरी विकास पॅनलचे शंकर पाटील, परमेश्वर मांडगे, बबन नेतने हे तीन उमेदवार आज विजयी झाले. तर गजानन घ्यार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. काँग्रेस, भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट यांनी एकत्रितपणे हा पॅनल उभा केला आहे. अपेक्षेप्रमाणे त्यांना यशही मिळत असल्याचे दिसत आहे.

माजी आमदार घुगे विजयीमाजी आमदार गजानन घुगे यांना भाजपने आपल्या पॅनलमध्ये स्थान दिले नव्हते. मात्र तरीही व्यापारी मतदारसंघातून त्यांनी विजयश्री खेचून आणली. तर शिंदे गटाचे अशोक मुंदडा हे विजयी झालेले दुसरे उमेदवार आहेत. भाजपचे प्रशांत सोनी यांना पराभवाचा धक्का बसला. आ.तान्हाजी मुटकुळे व आ.संतोष बांगर यांच्या विरोधानंतरही घुगे यांनी बाजी मारली, हे विशेष. तर हमाल मापारी मतदारसंघात माजी संचालक बुऱ्हान पहेलवान हे पुन्हा निवडून आले आहेत. त्यांनाही प्रचंड विरोध झाला होता.

टॅग्स :Hingoliहिंगोलीmarket yardमार्केट यार्ड