शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पशुधनाची कवडीमोलदराने विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:38 IST

यंदा अत्यल्प पावसामुळे गंभीर दुष्काळी स्थिती उद्भवली आहे. जवळा बाजार येथील आठवडी जनावरांच्या बाजारात लहाणमोठी ७०० च्या आसपास जनावरे रविवारी विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणली होती. ऐरवी ७० ते ८० हजाहरांना विक्री होणारी बैलजोडी रविवारी ३० ते ४० हजारांना विक्री होत होती.

लोकमत न्यूज नेटवर्कजवळा बाजार : यंदा अत्यल्प पावसामुळे गंभीर दुष्काळी स्थिती उद्भवली आहे. जवळा बाजार येथील आठवडी जनावरांच्या बाजारात लहाणमोठी ७०० च्या आसपास जनावरे रविवारी विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणली होती. ऐरवी ७० ते ८० हजाहरांना विक्री होणारी बैलजोडी रविवारी ३० ते ४० हजारांना विक्री होत होती.अत्यल्प पावसामुळे खरिपासह रबी हंगामही हातचा गेला. चारा पिकांची पेरणी करुनही पावसाअभावी उगवण झालीच नाही. त्यामुळे पशुपालकांकडे चाराच उपलब्ध नाही. हिवाळ्यातच चारा-पाण्याअभावी जनावरांची हेळसांड होत आहे. हे चित्र उन्हाळ्यात अधिक भयंकर होण्याचे चिन्हे दिसत असल्याने पशुपालकांनी जनावरे विक्री करणेच पसंद केले. मुलाबाळांप्रमाणे सांभाळ केलेल्या जनावरांची कवडीमोल दरात विक्री करण्याची वेळ आज शेतकºयावर आली आहे. येथील आठवडी बाजारात जनावरे खरेदीसाठी पशुपालक तुरळक हजेरी लावत होते. तर व्यापाºयांची संख्या जास्त होती. सद्यस्थितीत जनावरांचा सांभाळ करणे कठीण झाल्याचे पशुपालक सांगत होते. ज्या दावणीला आठ ते दहा जनावरे बांधलेली असत तेथे आता एक ते दोन जनावरे आहेत. ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सोय होती त्यांनी चारा पिकांची पेरणी केली. सध्या सर्वच जलस्त्रोत आटल्याने ती पिकेही वाळून गेली आहेत.जवळा बाजार येथील जनावरांच्या बाजारात रविवारी ३५० बैलजोड्या, १४० म्हैस, २०० शेळ्या आणि ५० ते ६० गाई विक्रीसाठी पशुपालकांनी आणल्या होत्या. दुष्काळाने बाजारात जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याचे चित्र आहे. नेहमीपेक्षा जास्त संख्येने जनावरांची संख्या २० जानेवारी रोजी दिसून आली.

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचारwater shortageपाणीटंचाई