जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आस्थापना मालक, दुकानदार, अधिनस्त कर्मचारी, फेरीवाले, किरकोळ विक्रेत्यांना दुकान उघडण्यासाठी कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे दुकानदारांसाठी कोरोना चाचणीचा कॅम्प येथील उपजिल्हा रुग्णालयात आयोजित केला होता. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी डॉ. रवी टाले, डॉ. प्राजक्ता कुहिरे, डॉ. शिवाजी विसलकर, डॉ. सुषमा टाक, सुनीता विणकरे, कल्पना पंधरे, विलास बुद्रुक, कैलास ताटे आदी परिश्रम घेत आहेत.
आजपर्यंत ४४६ दुकानदाराच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत एकूण प्राप्त ३५४ अहवालामध्ये ६ दुकानदार कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालय प्रशासन, नगर परिषद प्रशासन विभाग कळमनुरी यांनी शहरातील दुकानदारांना सदरील कॅम्पमध्ये येऊन आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.