लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : येथील ज्योतिर्लिंग असलेल्या श्री नागनाथ संस्थानला महावितरणच्या वतीने ३४.६१ लाख रुपयांचे बिल दिले. सदरील प्रकार हा व्यावसायिक दरातून संस्थानला वगळून घरगुती वापरात समाविष्ठ केल्याने झाला आहे. यामुळे संस्थानचे पदाधिकारी चांगलेच भडकले असून यामध्ये कायदेशिर मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला आहे.ऐन यात्रा महोत्सवात महावितरणच्या वतीने विद्युत जोडणी कापण्याची नोटीस बजावली आहे.औंढा ना. येथील श्री नागनाथ संस्थानला महावितरण कंपनीतर्फे २४ तास वीजपुरवठ्यासाठी एक्सप्रेस फिडर दिले आहे. संस्थानतर्फे नियमित विद्युत देयकाचा भरणा केला जातो. यासाठी महावितरण कंपनीकडून घरगुती वीज बिल आकारण्यात येत होते. धार्मिकस्थळ असल्याने पूर्वीपासूनच एमएसईबीच्या वतीने ही सुविधा संस्थानला प्रदान करून दिली होती. परंतु महावितरण कंपनीने या आर्थिक वर्ष २०११ पासून संस्थानच्या सर्वच विद्युत जोडण्यांना व्यापारी वीज वापरात बदल करून घेतले. मात्र तेव्हापासून आतापर्यंत कधी देयकात एवढा मोठा फेरबदल करण्यात आला नव्हता. आता अचानक केलेल्या या बदलामुळे देयकही अवाच्या सव्वा आल्याने संस्थानवर एकदाच मोठा भार पडला आहे.
औंढा संस्थानला ३४ लाखांचे वीजबिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:33 IST