शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

रोहित्रांचा खच पुन्हा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 00:07 IST

काही दिवसांपूर्वीच्या वादळी वाऱ्यात उपकेंद्रांतीलच ट्रान्सफार्मर जळाल्याने एकदाच ९ केएल आॅईल लागले. त्यामुळे पुन्हा आॅईलचा तुटवडा निर्माण झाल्याने नादुरुस्त रोहित्रांचा खच पडल्याचे चित्र हिंगोली येथे पहायला मिळत आहे. तुरळक ठिकाणी सिंचनासाठी मात्र बहुतांश ठिकाण गावठाण डीपी मिळत नसल्याची बोंब पुन्हा होत असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : काही दिवसांपूर्वीच्या वादळी वाऱ्यात उपकेंद्रांतीलच ट्रान्सफार्मर जळाल्याने एकदाच ९ केएल आॅईल लागले. त्यामुळे पुन्हा आॅईलचा तुटवडा निर्माण झाल्याने नादुरुस्त रोहित्रांचा खच पडल्याचे चित्र हिंगोली येथे पहायला मिळत आहे. तुरळक ठिकाणी सिंचनासाठी मात्र बहुतांश ठिकाण गावठाण डीपी मिळत नसल्याची बोंब पुन्हा होत असल्याचे दिसून येत आहे.हिंगोली जिल्ह्यात यंदा दुष्काळी चित्र आहे. सिंचनाच्या पट्ट्यात मोडणाºया वसमतलाच यंदा पाणी नसल्याने डीपींसाठी तेवढी ओरड नाही. मात्र दुष्काळामुळे वीज देयके भरायलाही शेतकऱ्यांची उदासीनता दिसत आहे. तर गावठाणची देयके भरूनही जळालेले रोहित्र दुरुस्त करून मिळत नसल्याने ही वेगळी बोंब आहे. मागील काही दिवसांपासून जळालेल्या रोहित्रांची संख्या पुन्हा वाढत चालल्याचे दिसून येत आहे. तीन दिवसांपूर्वीच्या आकडेवारीनुसार कृषीचे ९१ डीपी जळाले असून त्यापैकी १३ ठिकाणच्या लोकांनी थकबाकी भरली आहे. तर गावठाणचे २९ डीपी जळाले असून त्यापैकी ८ ठिकाणची थकबाकी भरली आहे. यात ६३ केव्हीएचे ५२ आहेत. तर १00 केव्हीएचे ३९ डीपी आहेत.जळालेले डीपी दुरुस्त करून देण्याचे काम सुरू आहे. मात्र आॅईलची समस्या सुटेपर्यंत ज्येष्ठतेनुसार प्रतीक्षा यादीतील काही जणांना रोज डीपी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यात थकबाकी भरणाºयांना प्राधान्य दिले जात असून इतरांना त्यानंतर डीपी दिला जात आहे. तर गावठाणच्या डीपींबाबत ओरड होत असल्याचे विचारल्यावर सध्या सिंचनाची सोय नसल्याने जेथे मागणी नाही, असे डीपी टाळून गावठाणचे डीपी दुरुस्तीस प्राधान्य दिले जात असल्याचेही उपकार्यकारी अभियंता अ.जब्बार यांनी सांगितले.गावठाणची बोंब : ८१ सिंगल फेज बंदसिंगल फेजच्या जळालेल्या डीपींची संख्या ८१ एवढी आहे. यापैकी २१ ठिकाणच्या ग्रामस्थांनी थकबाकीची रक्कमही भरली आहे. मात्र रोहित्र भरून देण्याची गती आॅईलच्या तुटवड्यामुळे पुन्हा मंदावली आहे.काही दिवसांपूर्वी मंजूर झालेले आॅईल जिल्ह्यात मागील दोन आठवड्यात झालेल्या वादळी वाºयादरम्यान नादुरुस्त झालेल्या उपकेंद्रांतील डीपीसाठी वापरण्यात आले होते.यामध्ये जवळपास ९ केएल आॅईल लागल्याने आता पाच केएल शिल्लक असून त्यात २५ ते ३0 डीपी दुरुस्त करू शकणार आहेत. आॅईल देण्याची मागणी केली असून मंजुरीही मिळाली आहे.सध्याही डीपी दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र लवकरच आॅईल उपलब्ध झाल्यानंतर कामात गती येईल. त्यानंतर गावठाणचे बहुतांश डीपी मिळतील, अशी आशा व्यक्त करण्यात आली.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज