शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

कोंबिंग ऑपरेशनमध्ये दरोडेखोराची टोळी जाळ्यात, स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिस ठाण्याची कारवाई

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: September 10, 2023 16:28 IST

Hingoli Crime News: पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या सूचनेनुसार हिंगोली शहर व परिसरात शनिवारी रात्री ११ ते रविवारी पहाटेपर्यंत कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले ५ जण ताब्यात सापडले. संशयित चोरट्यांनाही पकडण्यात पथकाला यश आले आहे. 

- चंद्रमुनी बलखंडेहिंगोली - पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या सूचनेनुसार हिंगोली शहर व परिसरात शनिवारी रात्री ११ ते रविवारी पहाटेपर्यंत कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले ५ जण ताब्यात सापडले. संशयित चोरट्यांनाही पकडण्यात पथकाला यश आले आहे. 

हिंगोली शहर व परिसरात मागील काही दिवसांपासून चोरटे सक्रिय झाले आहेत. शहराच्या कडेला असलेली घरे चोरट्यांचे टार्गेट ठरत आहे. त्यामुळे चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी रात्रीची गस्त घालण्यासोबतच कोंबिं ऑपरेशन राबविण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार पथकाने शनिवारी रात्री कोंबिंग ऑपरेशन राबविले. हे पथक हिंगोली शहरातील रामाकृष्णा मार्केट परिसरात रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास आले असता एका मोकळ्या जागेत काहीजण दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले. पोलिस येत असल्याचे दिसताच ते पळून जात होते. मात्र पोलिसांनी पाठलाग करून पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी शत्रु पुंजाजी चव्हाण (रा. खरबी ता. हिंगोली), अमोल संतोष पवार (रा. पारधीवाडा हिंगोली), चंदू जगन काळे (रा. पारधीवाडा हिंगोली), काशिनाथ विठ्ठल काळे (रा. पारधीवाडा हिंगोली), सुरज धुरपत चव्हाण (रा.पारधीवाडा हिंगोली) अशी नावे सांगितली. त्यांची झडती घेतली असता त्यांचेकडे लोखंडी खंजर, रॉड, पकड, दोरी, मिरची पावडर आदी साहित्य आढळून आले. ही कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे, सहायक पोलिस निरीक्षक राजेश मलपिलू, शिवसांब घेवारे, पोलिस अंमलदार वाठोरे, गजानन पोकळे, लिंबाजी वाहूळे, नितीन गोरे, ज्ञानेश्वर पायघन, विठ्ठल काळे, आझम प्यारेवाले, हरिभाऊ गुंजकर, महादू शिंदे आदींच्या पथकाने केली.  

हद्दपार व्यक्तीसह कोयता जप्तहिंगोली शहरचे सहायक पोलिस निरीक्षक मांजरमकर, पोलिस उपनिरीक्षक कपील आगलावे, पोलिस अंमलदार संभाजी लेकुळे, अशोक धामणे, क्षीरसागर, संतोष कुरे,  संजय मार्के, गणेश लेकुळे आदींच्या पथकानेही हिंगोली शहरात तपासणी केली. या पथकाला मस्तानशहा नगरात पवन सुरेश ठोके (रा. मस्तानशहानगर) याचेजवळ एक लोखंडी कोयता आढळून आला. इंदिरा गांधी चौक परिसरात शाहरूख खान हाफीज खान पठाण (रा. सेनगाव) हा एखादा गुन्हा करण्याच्या उद्देशाने लपून बसल्याचे आढळून आला. हिंगोली जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेल्या प्रदिप बाबूराव खंदारे (रा. अण्णाभाऊ साठे नगर हिंगोली) यास मच्छिमार्केट परिसरातून ताब्यात घेण्यात आले. पेन्शनपुरा भागात अकरम खॉ रहेमत खॉ पठाण (रा.पेन्शनपुरा) याच्याजवळून कोयता जप्त केला.तसेच औंढा रोड परिसरातून राहूल रोशन चव्हाण (रा. पारधीवाडा हिंगोली) हा चोरी, घरफोडी सारखा गुन्हा करण्याच्या उद्देशाने लपून बसल्याचे आढळून आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली