शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:14 AM2021-01-24T04:14:01+5:302021-01-24T04:14:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : जिल्ह्यातील शिक्षकांचे विविध प्रलंबित प्रश्न तत्काळ सोडवावेत, या मागणीसाठी विभागीय उपायुक्त सुरेश ...

Resolve pending questions of teachers | शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत

शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

हिंगोली : जिल्ह्यातील शिक्षकांचे विविध प्रलंबित प्रश्न तत्काळ सोडवावेत, या मागणीसाठी विभागीय उपायुक्त सुरेश वेदमुथा यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष जिरवणकर यांच्या नेतृत्वाखाली भेट घेण्यात आली. यावेळी शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत वेदमुथा यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर उपायुक्त वेदमुथा यांना विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.

जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षकांना जादा वेतनवाढ देण्यात यावी, २००५पूर्वी नियुक्त शिक्षकांची अंशदायी पेन्शन अंतर्गत कपात झालेली रक्कम भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करून हिशोब द्यावा, डीएसपीएस अंतर्गत कपात रकमेचा हिशोब द्यावा, जिल्हा आदर्श शिक्षकांचे पुरस्कार वितरीत करावेत, केंद्रप्रमुख, उच्चश्रेणी मुख्याध्यापक, अराजपत्रित मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, पदवीधर शिक्षक, विषय शिक्षकांची रिक्त पदे पदोन्नतीने भरावीत, सेनगाव व औंढा गटशिक्षणाधिकारी कार्यालयात लिपिक व सेवकांची पदे मंजूर करून ती भरावीत किंवा तात्पुरती व्यवस्था करावी, आदी प्रश्नांवर यावेळी चर्चा करण्यात आली. सेनगाव गटशिक्षणाधिकारी कार्यालयात सेवक व लिपिकाची व्यवस्था करण्याच्या सूचना वेदमुथा यांनी यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंत माळी यांना दिल्या. तसेच शिक्षकांचे अन्य प्रलंबित प्रश्नही सोडविण्यात येतील, असे आश्वासन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुभाष जिरवणकर, कार्याध्यक्ष इर्शाद पठाण, कोषाध्यक्ष शंकर सरनाईक, विनायक भोसकर, जेजेराम बदणे आदी उपस्थित होते.

Web Title: Resolve pending questions of teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.