शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत विक्रमी २० हजार क्विंटल हळदीची आवक, पाचशेंनी घसरला भाव

By रमेश वाबळे | Updated: April 15, 2024 18:24 IST

बाजार समितीच्या मार्केट यार्डात हळदीच्या मोजमापासाठी लागणार चार दिवस

हिंगोली : येथील बाजार समितीच्या हळद मार्केट यार्डात यंदाच्या वर्षातील विक्रमी आवक १५ एप्रिल रोजी झाली. तब्बल २० हजार क्विंटल हळद विक्रीसाठी आली असून, मार्केट यार्ड आवारासह बाहेरील रस्त्यावर वाहनांची एक ते दीड कि.मी.पर्यंत रांग लागली. या सर्व हळदीचे मोजमाप करण्यासाठी चार दिवसांचा कालावधी लागणार आहे. दरम्यान, क्विंटलमागे भावात जवळपास पाचशे रुपयांची घसरण झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

मराठवाड्यासह विदर्भात हळद खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या येथील बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात विक्रमी आवक होऊ लागली आहे. १५ एप्रिल रोजी भावात क्विंटलमागे जवळपास पाचशे रुपयांची घसरण झाली तरी सध्या मिळणारा भाव समाधानकारक आहे. त्यामुळे हळद तयार होताच शेतकरी मार्केट यार्डात विक्रीसाठी आणत आहेत. त्यामुळे आवक वाढत आहे.

१४ एप्रिल रोजी मार्केट यार्ड रविवारच्या नियमित सुटीमुळे बंद होते. परंतु, सोमवारी खरेदी-विक्री होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी रविवारीच हळद घेऊन मार्केट यार्ड जवळ केले. त्यामुळे रात्री ८ वाजेपर्यंत मार्केट यार्डात वाहने उभी करण्यासाठी जागा शिल्लक नव्हती. परिणामी, नंतर आलेल्या वाहनांना मार्केट यार्डाबाहेरील रेल्वे स्टेशन रोडवर वाहने उभी करावी लागली. सोमवारी दुपारी २ वाजेपर्यंत जुने पोलिस अधीक्षक कार्यालय, जुन्या शासकीय रुग्णालयापर्यंत वाहनांची रांग लागली होती.

दररोज ५००० क्विंटलचा काटा...मार्केट यार्डातील मनुष्यबळानुसार दररोज पाच हजार क्विंटलचा काटा होऊ शकतो. शेतकऱ्यांच्या हळदीचे लवकर मोजमाप व्हावे यासाठी बाजार समितीचा प्रयत्न असतो. परंतु, विक्रमी आवक होत असल्यामुळे उशीर लागत असल्याचे चित्र चित्र आहे. सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंत जवळपास २० हजार क्विंटलची आवक झाल्याने मोजमापासाठी चार दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रHingoliहिंगोली