हिंगोली येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवात रावण दहनासाठी गर्दी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 05:33 PM2018-10-18T17:33:30+5:302018-10-18T17:37:36+5:30

येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवाची १६४ वर्षांची परंपरा आहे.

Ravana Dahan's crowd at the historic Dasara festival in Hingoli | हिंगोली येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवात रावण दहनासाठी गर्दी 

हिंगोली येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवात रावण दहनासाठी गर्दी 

googlenewsNext

हिंगोली : येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवाची १६४ वर्षांची परंपरा आहे. आज महोत्सवात ११.३० वाजता रावणाच्या दसमुखी ५१ फुटी पुतळ्याचे दहन करण्यात येणार आहे. दसरा महोत्सव पाहण्यासाठी राज्य-परराज्यातून शहरात आज सकाळपासूनच अलोट गर्दी जमली आहे. रात्री रोषणाई व आतषबाजीच्या झगमगाटातत रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात येणार आहे.

रामलीला मैदानावर परंपरेनुसार रावण दहनाची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे.  हिंगोली येथील ऐतिहासिक रावण दहन पाहण्यासाठी राज्य-परराज्यातून आज सकाळपासूनच रामलीला मैदानावर मोठी गर्दी  जमली. दसरा प्रदर्शनीतील आकाश पाळणे, मौत का कुआँ, यासह विविध मनोरंजनात्मक खेळ व स्टॉलवर कुटुंबियांसह बच्चे कंपनीची गर्दी होत आहे. 

दरवर्षी प्रमाणे रावणाच्या ५१ फुटी पुतळ्याचे दहन पाहण्यासाठी नागरिक हिंगोलीत दाखल होत आहेत. दुर्गा महोत्सव व दसरा सणानिमित्त हिंगोलीत उत्साहाचे वातावरण आहे. दसरा सणानिमित्त झेंडूच्या फुलांनी बाजारपेठ सजली असून पूजेचे साहित्य खरेदीसाठीही शहरातील गांधीचौक येथे गर्दी  झाली आहे. दुर्गा व दसरा महोत्सवामुळे आनंदाचे वातावरण आहे. तसेच पोलीस प्रशासनाकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. जागो-जागी पोलीस कर्मचारी तसेच फिरत्या वाहनांद्वारे पोलीस गस्त घालत आहेत.

Web Title: Ravana Dahan's crowd at the historic Dasara festival in Hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.