शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टी अनुदानासाठी गोरेगावात रस्ता रोको; शेतकरी संपावर ठाम

By यशवंत भीमराव परांडकर | Updated: September 19, 2022 15:39 IST

सेनगाव तालुक्यातील गोरेगावसह बाभुळगाव आजेगाव व पुसेगाव चार मंडळे अतिवृष्टी अनुदान लाभातुन डावलण्यात आली आहेत

गोरेगाव (जि. हिंगोली) : येथे अतिवृष्टी अनुदानासाठी गेल्या चार दिवसापासून शेतकरी संप सुरू असुन १९ सप्टेंबर रोजी गोरेगावसह परिसरातील शेतकऱ्यांकडून येथील जिजाऊ चौक चौफुली रस्त्यावर जवळपास तासभर रस्ता रोको करण्यात आला.

सेनगाव तालुक्यातील गोरेगावसह बाभुळगाव आजेगाव व पुसेगाव चार मंडळे अतिवृष्टी अनुदान लाभातुन डावलण्यात आल्यामुळे गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर १६ सप्टेंबर पासून शेतकरी संप सुरू असून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केली जात आहेत . तर १९ सप्टेंबर रोजी माजी जि.प. उपाध्यक्ष अनिल पतंगे यांचे नेतृत्वात गोरेगाव येथील जिजाऊ चौक चौफुली रस्त्यावर शेतकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक विष्णुपंत भुतेकर , तंटा मुक्ती अध्यक्ष अमोल खिल्लारी , माजी पं . स . सदस्य अशोक कावरखे , वसीम देशमुख , संतोष काळे , राधेश्याम कावरखे , भीमराव नायक , पं. स . सदस्य किशोर पाटील बाभुळगावकर , केतुल हनवते , अँड. प्रविण नायक आदी सह गोरेगाव , बाभुळगाव , सवना सर्कलच्या शेतकऱ्यांची उपस्थिती होती . मुख्य रस्त्यावर ठिय्या मांडत शेतकऱ्यांनी जवळपास तासभर रस्ता रोको आंदोलन केले.

शेतकरी संपावर ठाम ...गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या सुरू असलेल्या शेतकरी संप आंदोलनास तहसीलदार जीवककुमार कांबळे यांनी भेट दिली. प्रसंगी विष्णुपंथ भुतेकर यांच्या मध्यस्थीने संप मागे घेण्यासंदर्भात चर्चा झाली असता शेतकऱ्यांनी गोरेगाव येथील पर्जन्यमापक यंत्र गेल्या सात आठ वर्षा पासुन बंद असल्याचे सांगीत चुकीच्या अहवाल सादर करून अतिवृष्टीतुन डावलल्याची तक्रार मांडली.

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरी