शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थान येथील मुलगा हिंगोलीत सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 01:18 IST

शहरातील रेल्वेस्थानक परिसरात २२ जून रोजी आढळलेला १0 वर्षाचा मुलगा राजस्थानचा सवाई माधोपूर जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. रेल्वे पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांमुळे त्याचा पत्ता सापडला. माधोपूरचे पोलीस अधिकारी व बालकाचे नातेवाईक लवकरच हिंगोलीला त्याला नेण्यासाठी येणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील रेल्वेस्थानक परिसरात २२ जून रोजी आढळलेला १0 वर्षाचा मुलगा राजस्थानचा सवाई माधोपूर जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. रेल्वे पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांमुळे त्याचा पत्ता सापडला. माधोपूरचे पोलीस अधिकारी व बालकाचे नातेवाईक लवकरच हिंगोलीला त्याला नेण्यासाठी येणार आहेत.शुक्रवारी परळी-अकोला या ट्रेनमध्ये हा बालक आढळून आला. बालकासोबत कोणी नातेवाईक दिसत नाहीत, तो एकटाच ट्रेनमधून प्रवास करीत असल्याने रेल्वेतील प्रवासी रवींद्रसिंह राजपूत यांनी या बालकाची माहिती हिंगोली रेल्वे पोलिसांना दिली. या बालकास जीआरपी गणेश जाधव यांच्या स्वाधीन करण्यात आले. जाधव यांनी मुलाची विचारपूस केली, असता हरविलेला बालक बन्टी असे नाव सांगत आहे. तसेच राजस्थान येथून ट्रेनमध्ये बसल्याचेही तो सांगत आहे. त्यावरून जीआरपी जाधव यांनी सदर बाब नांदेड पोलिसांना कळविली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी राजस्थान पोलिसांशी संपर्क केला असता, सवाई माधोपूर जिल्ह्यातील गंगापूर सिटी पोलीस ठाण्यात बन्टी नावाचा बालक हरविल्याची तक्रार दाखल आहे. गंगापूर ठाण्यातील पीएसआय उर्मिला मीना व या बालकाचे नातेवाईक हिंगोलीला येत आहेत. ओळख पटल्यानंतर बन्टीला त्यांच्या स्वाधीन केले जाईल, असे पोकॉ जाधव यांनी सांगितले.लहान मुले पकडून नेणाऱ्या टोळ्या फिरत असल्याच्या संदेशांमुळे एकीकडे पालक हैराण होत आहेत. तर दुसरीकडे शेकडो किमी अंतरावरील बालक याच व्हॉटस्अ‍ॅप संदेशांमुळे नातेवाईकांना पुन्हा सापडत आहे. त्यामुळे नागरिकांनी या माध्यमाचा चांगला उपयोग करायचे ठरवले तर किती चांगले काम हातून घडू शकते, हे दिसून येत आहे.पोलिसांनी घेतली मुलाची काळजी४हिंगोली स्थानकात आढळून आलेला मुलगा रेल्वे पोलिसांच्या ताब्यात असताना बालकास नवीन कपडे देण्यात आले. हा बालक घारबलेला असल्याने तो प्रथम काहीही बोलण्यास तयार नव्हता. जीआरपी जाधव यांनी बालकास जेवण व नवीन कपडे दिले. त्यानंतर बालकाच्या मनातील भीती काहीसी दूर झाली. जाधव यांना दीपक धांडे यांनीही मदत केली. या बालकाची नोंद हिंगोली रेल्वे पोलिसांत केली आहे. बालकाची पुढील काळजी व सुरक्षिततेसाठी बालकल्याण समितीच्या आदेशान्वये बालकास बालगृहात ठेवण्यात आले आहे. बालकास सोमवारी नातेवाईकांच्या स्वाधीन केले जाईल, असे समितीचे सदस्य अ‍ॅड. संभाजी माने यांनी सांगितले.

 

टॅग्स :HingoliहिंगोलीCrimeगुन्हा