शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे पोलीसच करायचा गांजा तस्करी; हिंगोलीत ३८ किलो गांजासह तिघे ताब्यात 

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: March 3, 2023 13:13 IST

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई: रेल्वे पोलिस कर्मचाऱ्यासह तिघेजण ताब्यात

हिंगोली: एका कारमधून ९ लाख ६५ हजार रुपये किमतीचा गांजा घेऊन जाणाऱ्या एका रेल्वे पोलिस कर्मचाऱ्यासह तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. ही कारवाई औंढा येथे २ मार्च रोजी सायंकाळी केली. या प्रकरणी रात्री ११.३० वाजता गुन्हा दाखल झाला.

औंढा ना ते परभणी रोडवरून एका कारमधून गांजाचा साठा नेला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील , पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीचे सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या पथकाने औंढा ना येथील शासकीय विश्रामगृहाजवळ सापळा लावला. 

या वेळी कारची तपासणी केली. तेव्हा कारमध्ये १४ पाकिटात ३८ किलो ६०० ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी ९ लाख ६५ हजार रुपये किमतीच्या गांजासह ५ लाखांची कार असा एकूण १४ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या फिर्यादीवरून  रवींद्र अमरसिंह राठोड (  लोहमार्ग पोलीस चौकी पूर्णा, रा.कृष्णा ता. जिल्हा वाशिम), शेख गौस शेख पाशा ( कारचालक रा. पूर्णा),शेख मईनोद्दीन शेख अलीमोद्दीन (रा. पूर्णा) याच्या विरुद्ध औंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ही कारवाई पोलिस निरीक्षक  पंडित कच्छवे, सपोनी शिवसांब  घेवारे,  पोलिस अंमलदार संभाजी लकुळे,गजानन पोकळे, गणेश लेकूळे, ज्ञानेश्वर पायघन,तुषार ठाकरे, रविकांत हरकळ, गिरी यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली